SHARE

गोरेगाव - आंबेडकरनगर परिसरातल्या जयअंबे झोपडपट्टीत राहणाऱ्या सुरेश हलजनचा मारहाणीत मृत्यू झाला होता. मंगळवारी सिद्धार्थ रुग्णालयात सुरेश हलजनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आला होता. मात्र 24 तास उलटूनही सुरेश हलजनचा मृतदेह सिद्धार्थ रुग्णालयात पडून आहे. कुटुंबियांना अजूनही सुरेशचा मृतदेह सोपवण्यात आला नाहीये.

याप्रकरणी वनराई पोलिसांनी आरोपी विलास उर्फ काका आणि निपेन उर्फ राजू यानां मंगळवारी रात्री अटक केली. बुधवारी त्यांना कोर्टात हजर केले असता सात नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या