NCB च्या ताब्यात असलेल्या आर्यन शाहरुख खानविषयी जाणून घ्या सर्व काही

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान बद्दल जाणून घ्या सर्व काही...

NCB च्या ताब्यात असलेल्या आर्यन शाहरुख खानविषयी जाणून घ्या सर्व काही
SHARES

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या मुलाला अंमली पदार्थ नियंत्रण कक्षानं (NCB) ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. आर्यन खान (Aryan khan) हा बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि इंटिरिअर डिझायनर-चित्रपट निर्माती गौरी खान यांचा सर्वात मोठा मुलगा. तो २३ वर्षांचा आहे.

आर्यननं लहानपणीच काही बॉलिवूडपटांसाठी डबिंग करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये द लायन किंग, द इन्क्रेडिब्ल्स (हम है लाजवाब) यासारख्या सिनेमांचा समावेश आहे. २००४ मध्ये त्याला हम है लाजवाब या अॅनिमेशनपटासाठी सर्वोत्कृष्ट डबिंग चाईल्ड आर्टिस्टचा पुरस्कारही मिळाला होता.

२००१ मध्ये कभी खुशी कभी गम चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पाय ठेवलं. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्यानं शाहरुखच्या बालपणीची भूमिका साकारली होती. २००६ मध्ये कभी अलविदा ना कहना सिनेमातही तो झळकला होता. लंडनच्या सेव्हन ओक्स स्कूलमध्ये त्यानं शिक्षण घेतलं. तर युनिव्हर्सिटी ऑफ सदन कॅलिफोर्नियामधून त्यानं चित्रपट निर्मिती आणि लेखन विषयात पदवी मिळवली.

महाराष्ट्रातील ताईक्वांदो स्पर्धेत त्याला २०१० मध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे. त्याच्याकडे ब्लॅक बेल्ट असून मार्शल आर्ट्समध्येही तो प्रशिक्षित आहे. त्याला क्रीडा क्षेत्रातही विशेष रस आहे.

दरम्यान, मुंबई-गोवा क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यन खानची (Aryan Khan) एनसीबी अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीनं ताब्यात घेतलं आहे.

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ही रेव्ह पार्टी सुरू होती. या क्रूझवर फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारी निघून ही बोट सोमवारी मुंबईत परतणार होती. या क्रूझवर हायप्रोफाईल रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला तीन दिवसांपूर्वीच मिळाली होती. हायप्रोफाईल पार्टी असल्यानं एनसीबीनं शेवटपर्यंत या ऑपरेशनविषयी गुप्तता बाळगली होती.



हेही वाचा

शाहरुखचा मुलगा NCBच्या ताब्यात, क्रूझवर रंगलेली रेव्ह पार्टी

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा