वासनांध अधिकाऱ्याला महिलेने चोपले

अंधेरी - अंधेरी मेट्रो स्टेशनवर वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याला महिला सुरक्षारक्षक असलेल्या महिलेने चोप दिल्याची घटना घडलीय. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. विश्वास दुदुस्कर असे या अधिकाऱ्याचे नाव असून, तो महिलेची बदली करण्यासाठी तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत होता. अखेर या महिलेने दुर्गावतार धारण करत या अधिकाऱ्याला चांगलाच चोप दिला. अंधेरी मेट्रोमध्ये कार्यरत असलेल्या या 32 वर्षीय महिला सुरक्षा रक्षकाला तिचे वरिष्ठ अधिकारी विश्वास दुदुस्कर वर्षभरापासून त्रास देत होते.

विशेष म्हणजे या घटनेनंतर वरिष्ठांनी या महिलेला बोलावून घेतले आणि तू जे आरोप करत आहेस ते तुला सिद्ध करावे लागतील. जर हे खोटं असेल तर तुझ्यावर गुन्हा दाखल होईल असा दमच भरला. जर वरिष्ठांकडून करण्यात आलेल्या शोषणाकडे वरिष्ठ या नजरेने बघत असतील तर महिला सुरक्षारक्षक सुरक्षित तरी कशा असतील असा प्रश्न निर्माण झाला.

Loading Comments