लोकलमधील सराईत महिला चोर अटकेत


लोकलमधील सराईत महिला चोर अटकेत
SHARES

मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर आजपर्यंत अनेक अट्टल चोरांना चोरी करताना आपण व्हिडिओत पाहिले किंवा बातम्या वाचल्या असतील. आता अशाच एका महिला प्रवाशांचे मौल्यवान दागिने चोरून रुळ ओलांडून पळ काढणाऱ्या महिला चोराला कुर्ला पोलिसांनी अटक केली आहे.


मंगळसूत्र हिसकावून पळ काढला

महालक्ष्मी परिसरात राहणारी आरोपी सीता सोनावणे हिची आर्थिक स्थिती हालाखिची आहे. छोटे मोठे काम करून घरचा गरजा भागवू न शकणाऱ्या सीताने अखेर चोरीचा मार्ग अवलंबला. टीव्हीवर चोरींच्या अनेक घटनांच्या बातम्या वाचून तिने अशा प्रकारच्या चोऱ्या करण्यास सुरुवात केली. 


शनिवारी विक्रोळी रेल्वे स्थानकावर सीताने एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून रुळ ओलांडून पळ काढला. दरम्यान पीडित महिलेने रेल्वे पोलिसांत तक्रार दिली. पोलिस तपासात सीसीटीव्हीत सीताने केलेल्या चोरीची संपूर्ण घटना कैद झाली होती. या फूटेजच्या मदतीने पोलिसांनी सीताचा शोध घेत तिला रविवारी कळवा येथून अटक केली.

कळवा येथील अनेक ज्वेलर्स कमी किंमतीत चोरीचे दागिने विकत घेतात. सीताने ज्या ज्वेलर्सला सोने विकले आहे. त्याचा आता पोलिस शोध घेत आहेत. याआधीही सीताने अशा प्रकारे चोऱ्या केल्याची कबुली दिली असून पोलिस त्या अनुशंगाने तपास करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा