कधी बदलेल मानसिकता ?

  Mumbai
  कधी बदलेल मानसिकता ?
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबईत घडणाऱ्या बलात्कारावर कायदा कठोर केला खरा, पण गुन्ह्यांचा आलेख हा चढत्याच दिशेनं पाहायला मिळतो. नुकताच जोगेश्वरीत झालेल्या बलात्कारामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. तर 'बलात्काराचे गुन्हे वाढतच राहातील, जो पर्यंत लोकांची मनोवृत्ती बदलत नाही, तोपर्यंत हा आलेख कमी होणारा नाही असं मुंबईचे माजी सह पोलीस आयुक्त वाय. सी. पवार म्हणाले.

  ऑगस्ट २०१३ मध्ये शक्ती मिल परिसरात महिला फोटोजर्नलिस्टसोबत सामूहिक बलात्काराचं प्रकरण समोर आलं, त्यानंतर ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंतच मुंबईत तब्बल १५० रेपचे गुन्हे नोंदवले गेले. त्यातील १२३ प्रकरण सोडवणं पोलिसांना शक्य झालं. तर २०१४ साली रेपच्या एकूण ६१० केसेस मुंबईत घडल्या, ज्यातील ५५५ प्रकरणात पोलिसांनी आरोपींना गजाआड केलं. तर २०१५ साली तब्बल ७१२ बलात्काराच्या घटनांची मुंबईत नोंद झाली. ज्यातील ६४३ प्रकरणी पोलिसांनी आरोपीना बेड्या ठोकल्या. या वर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत मुंबईत ४४३ रेपचे गुन्हे नोंद असून ३८९ प्रकरणात पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आलं.
  बलात्काराच्या गुन्ह्यात डिटेक्शनचं प्रमाण हे ९० टक्क्यांच्या घरात असलं तरी रेपच्या गुन्ह्यांचा चढता आलेख हे मुंबईसाठी नक्कीच चिंतेची बाब आहे.

  या वेळी वाय. सी. पवार यांनी क्रिमिनल जस्टीस सिस्टीमला लक्ष केल, बलात्काराच्या गुन्ह्यांवर जरब बसवायची असेल तर पोलिसांकडे पद्धती आहेत, पण मानवाधिकार समिती आणि इतर समिती त्याला सहमत होत नाहीत, शिक्षा झाल्यावर देखील काही दिवसातच आरोपी जामिनावर बाहेर येतात, कधी पेरोलवर, तर कधी फर्लोच्या नावाखाली आरोपी बाहेर येतात. पोलिसांकडे जादूची कांडी आहे असं समजून त्यांच्याकडून अपेक्षा करणं चुकीचे आहे." असंही ते पुढे म्हणालेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.