अश्लील मेसेज करणारा बँक कर्मचारी अटकेत

कांदिवली - कांदिवलीतल्या अॅक्सिस बँकेच्या शाखेत उपव्यवस्थापक म्हणून कार्यरत असणाऱ्या विनय यादवला अटक करण्यात आलीये. या बँकेत कर्जासाठी अर्ज करणाऱ्या एका महिलेच्या फॉर्मवरील फोन नंबर घेऊन यादवनं तिला अश्लील मेसेज पाठवले होते.

12 डिसेंबरला विनयनं एका नंबरवरून या महिलेला अश्लील मेसेज पाठवले. या महिलेनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली आणि विनयच्या मुसक्या आवळल्या. यापूर्वीही विनयनं अशा प्रकारे महिलांना अश्लील मेसेज केल्याचं उघड झालंय. विनयला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये.

Loading Comments