जीव रक्षकांच्या सतर्कतेमुळे वाचले तिघांचे प्राण

 Aksa Beach
जीव रक्षकांच्या सतर्कतेमुळे वाचले तिघांचे प्राण
Aksa Beach, Mumbai  -  

मलाड - अक्सा बीचवर तैनात असलेल्या जीव रक्षकांनी बुडणाऱ्या एका मुलीचा आणि दोन मुलांचा जीव वाचवलाय. हे तिघेही अक्सा बीचवर फिरायला गेले होते. हे तिघेही समुद्राच्या किनारी होते. त्यावेळी अचानक पाण्याची पातळी वाढल्याने हे तिघेही पाण्यात ओढले गेले. मात्र सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे यांचा जीव वाचला. 

मिळालेल्या माहितीनुसार गोरेगाव (पू.) इथल्या संतोषनगरमध्ये रहाणारी १७ वर्षांची रुक्सार अन्सारी, अब्दुल करीम शेख (२१) आणि दानिश खान (१८) गुरुवारी सकाळच्या दरम्यान अक्सा बीचवर फिरायला गेले होते. त्यावेळी ते तिघेही समुद्राच्या किनारी बसले होते. त्यावेळी अचानक पाण्याची पातळी वाढली आणि त्यात ते तिघेही बुडू लागले. मात्र याची माहिती मिळताच तिथे तैनात असलेल्या जीव रक्षक सचिन मुळीक आणि स्वतेज कोळंबकर यांनी या तिघांचा जीव वाचवला.

Loading Comments