कपिल वाधवानला आणखी एक झटका, लाँकडाऊन तोडल्या प्रकरणी हायकोर्टाची नोटीस


कपिल वाधवानला आणखी एक झटका, लाँकडाऊन तोडल्या प्रकरणी हायकोर्टाची नोटीस
SHARES

लॉकडाऊन असताना प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या विशेष परवानगीने महाबळेश्‍वरला गेलेल्या उद्योजक कपिल वाधवान यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. वाधवान याला हायकोर्टाने लाँकडाऊनचे उल्लघंन केल्या प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे. कोर्टाने  न्यायालयाने घातलेल्या अटी उल्लघंन न करण्याच्या अटीवर वाधवान यांना जामीन दिला होता. माञ वाधवान यांनी न्यायालयाच्या अटीचे उल्लघंन केल्याचा अर्ज अंमलबजावणी संचालनालयाने केल्यानंतर हायकोर्टाने वाधवान यांना नोटीस पाठवली आहे. 

डीएचएफएलचे प्रवर्तक व मनी लॉन्डरिंग प्रकरणातील आरोपी कपिल वाधवान यांना दिलेला जामीन रद्द करण्यात यावा, अशी विनंती ईडीने मुंबई हायकोर्टात एका अर्जाद्वारे केली आहे. वाधवान यांना जामीन देताना घातलेल्या अटींचे उल्लंघन झाले आहे तसेच राज्यात लॉकडाऊन सुरू असतानाही ते न जुमानता महाबळेश्‍वरपयर्ंत प्रवास केल्याने त्यांचा जामीन रद्द करावा, असे ईडीने अर्जात नमूद केले आहे. ईडीच्यावतीने अँड. पुर्णिमा कांथारिया यांनी हा अर्ज दाखल केला असून याप्रकरणी वाधवान यांना नोटीस बजावत कोर्टाने २३ एप्रिल रोजी सुनावणी ठेवली आहे. दीवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान यांना २७ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. मयत गँगस्टर इक्बाल मिर्चीशी राहिलेल्या कनेक्शनवरून ईडीने ही कारवाई केली होती. मनी लॉन्डरिंग कायद्याखाली वाधवान यांना अटक झाली होती. त्यानंतर मुंबईतील पीएमएलए कोर्टाने २१ फेब्रुवारी रोजी वाधवान यांना सशर्त जामीन मंजूर केला होता. 

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सध्या महाराष्ट्र आणि देशात लॉकडाऊन सुरू आहे. सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आलेल्या आहेत. असे असताना कपिल वाधवान, त्यांचे बंधू धीरज वाधवान व कुटुंबातील अन्य सदस्य आणि नोकरवर्ग प्रथम मुंबई ते खंडाळा आणि तिथून पुढे महाबळेश्‍वर येथे पोहचला. लॉकडाऊन असतानाही प्रवासाचा विशेष पास मिळवून वाधवान कुटुंबाच्या गाड्या महाबळेश्‍वरला पोहचल्या. याप्रकरणी आधीच २३ जणांविरुद्ध महाबळेश्‍वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. शिवाय त्यांच्या पाच आलिशान कारही जप्त करण्यात आल्या आहेत. या कार ताब्यात घेण्याची कारवाई ईडीने सुरू केली आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा