सोसायटीतील तरूणांवर मोठी जबाबदारी, कोविड पोलीस म्हणून होणार नेमणूक

सोसायटी परिसरात खरेदीला 2 तासांची जरी परवानगी मिळाली. तरी एका घरातील तीन ते चार जण पाय मोकळे करण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच अशा बेशिस्त नागरिकांना आवर घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी 'कोविड पोलिस' ही नवी संकल्पना सुरू केली आहे.

सोसायटीतील तरूणांवर मोठी जबाबदारी, कोविड पोलीस म्हणून होणार नेमणूक
SHARES
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ही, या ना त्या कारणाने घराबाहेरपडणाऱ्यांची संख्या अद्याप कमी झालेली नाही. अशांवर कारवाई करण्यासाठी गेलेले अनेक पोलिस कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी आप आपल्या पोलिस ठाण्याअंतर्गत 'कोविड पोलिस' ही नवी संकल्पना सुरू केली आहे.  सध्या या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे..


मुंबईतील अनेक परिसर हे सध्या कोरोनाचे हाँटस्पाँट बनले आहे. कित्येक उपाय योजना करून ही रुग्णांची संख्या कमी होण्या ऐवजी वाढतच आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांवरचा ही भार वाढतचं आहे. मुंबई पोलिसांनी नागरिकांनी विना कारण बाहेर पडू नका, असे आव्हन करून सुद्धा अनेक कारण सांगून लोक घराबाहेर पडत आहेत. सोसायटी परिसरात खरेदीला 2 तासांची जरी परवानगी मिळाली. तरी एका घरातील तीन ते चार जण पाय मोकळे करण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच अशा बेशिस्त नागरिकांना आवर घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी 'कोविड पोलिस' ही नवी संकल्पना सुरू केली आहे.

या संकल्पनेत पोलिसांनी त्या त्या परिसरातील किंवा इमारतीमधील स्वइच्छेने तरुण आणि तरुणींची नेमणूक करत, त्यांना त्याच्या इमारतीतील, चाळीतील नागरिकांना गरजेच्या वस्तू घरपोच देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त कुणी ही सोसायटी अथवा चाळीच्या बाहेर पडू नये, अशा सूचना संबधित पोलिस ठाण्यांनी विभागात केलेल्या आहेत. तसेच या कोविड पोलिस संकल्पनेतील वाँलिंटियरला देखील सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस सर्व सुविधा देत आहेत. तसेच तात्काळ वैद्यकिय सेवा हवी असल्यास हे वाँलिंटियर स्थानिक पोलिसांशी संपर्क साधत असून पोलिस तातडीने रुग्णवाहिका किंवा त्यांच्या गाडीतून रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात नेत आहेत.

 या संकल्पनेमुळे नागरिक अत्यावश्यक वस्तूसाठी घराबाहेर ही पडणार नाहीत आणि रस्त्यावरील गर्दी कमी झाल्यामुळे कोरोनावर नियंञन मिळवण्यात ही यश येईल, अशी ही संकल्पना आहे. मुंबईच्या भायखळा पोलिसांनी सध्या त्यांच्या परिसरात 160 कोविड पोलिस वाँलिंटियरची नेमणूक करत ही संकल्पना राबवण्यास सुरूवात केली असून नागरिकांचा ही या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती भायखऴा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश कदम यांनी दिली.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा