राज्यात अफवा पसरवल्या प्रकरणी आतापर्यंत २५५ जणांना अटक

राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४७० गुन्ह्यांची (ज्यापैकी ३१ N.C आहेत) नोंद १० जून २०२० पर्यंत झाली आहे.

राज्यात अफवा पसरवल्या प्रकरणी आतापर्यंत २५५ जणांना अटक
SHARES

लॉकडाऊन (Lockdown)च्या काळात राज्यामध्ये,काही जण परिस्थितीचा  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली आहेत.  राज्यात सायबर संदर्भात ४७०  गुन्हे दाखल झाले असून २५५ व्यक्तींना अटक केली असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.

हेही वाचाः- आज मध्यरात्रीपासून मालाडच्या मढ भागात टोटल लॉकडाऊन

राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४७० गुन्ह्यांची (ज्यापैकी ३१ N.C आहेत) नोंद १० जून २०२० पर्यंत झाली आहे.  या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९४ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी  १९१  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,tiktok विडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ५० गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २५५ आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे .

  अँप वेबसाईट सुरक्षिततेची  खात्री करा

सध्याच्या काळात , सरकारने ऑनलाईन मद्य खरेदीला व डिलिव्हरीला सशर्त परवानगी दिली आहे .महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि जर तुम्हाला मद्य खरेदी करायचेच असल्यास सदर अँप किंवा वेबसाईट  वापरण्यासाठी सुरक्षित आहे याची  खात्री करा व मगच  वापरा ,तसेच कुठल्याही अँपवर शक्यतो आपला बँक खात्याचा नंबर ,डेबिट /क्रेडिट कार्ड नंबर व त्यांचे पिन नंबर सेव करू नका. शक्यतो cash on delivery चा पर्याय ऑर्डर बुक करताना निवडा . जर अशा वेबसाईट किंवा अँपवर तुम्ही फसविले गेले असाल तर त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद करा व www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण  नोंदवा.असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

हेही वाचाः- वाहतूककोडींवर पर्याय; मुंबई पोलिसांची ‘सॅगवे’ने गस्त

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा