अफवा पसरवणाऱ्या 132 जणांवर गुन्हे
राज्यात सध्या सोशल मिडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्यांविरोधात सायबर पोलिसांनी फास आवळला आहे. राज्यभरात अशा समाजकंटकांवर तब्बल 132 गुन्हे नोंदवण्यात आले आहे. महाराष्ट्र सायबर पोलिस सध्या टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. तीन दिवसात सायबर पोलिसांनी राज्यातील विविधपोलिस ठाण्यात नवीन 19 गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये बीड 16, कोल्हापूर 13,पुणे ग्रामीण 11, मुंबई 9, जालना 8, सातारा 7, जळगाव 7, नाशिक ग्रामीण 6, नागपूर शहर 4, नाशिक शहर 5, ठाणे शहर 4, नांदेड 4, गोंदिया 3, भंडारा 3, रत्नागिरी 3, परभणी 2, अमरावती 2, नंदुरबार 2, लातूर 1, उस्मानाबाद 1,हिंगोली 1यांचा प्रामुख्याने समावेश आहे .या सर्व गुन्ह्यांत व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 79 गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 24 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,titktok विडिओ शेअर प्रकरणी 3गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी 3 गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी 23 गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत 35 आरोपींना अटक केली असल्याचे राज्य सायबर पोलिस उप महानिरीक्षक हरीष बैजल यांनी सांगितले. आतापर्यंत करण्यात आलेल्या अनेक कारवायांमध्ये ग्रुपमधील उपद्रवींकडून पसरवण्यात आलेल्या अफवांना ग्रुप अँडमिनला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळेच बैजल यांनी व्हाँट्स अँप ग्रुप अँडमिना सध्याच्या पार्श्वभूमिवर त्याच्या ग्रुपमधील सेटींगमध्ये जाऊन ज्या ग्रुपला ते अँडमिन आहेत. त्या ग्रुपवर फक्त तेच मेसेज टाकू शकतील अशी सेटींग करण्याचे आवाहन बैजल यांनी केले आहे.