• प्रवाशांना मिळाले चोरीला गेलेले मोबाईल
  • प्रवाशांना मिळाले चोरीला गेलेले मोबाईल
  • प्रवाशांना मिळाले चोरीला गेलेले मोबाईल
SHARE

वडाळा - हार्बर मार्गावरून लोकलने प्रवास करतेवेळी चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध वडाळा लोहमार्ग पोलिसांनी लावला आहे, 23 नोव्हेंबर रोजी 15 प्रवाशांना त्यांनी नोंदविलेल्या तक्रारीची शहानिशा करून मोबाईल सुपूर्द करण्यात आले आहेत. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय.बी.सरोदे, पोलीस निरीक्षक सतिश पवार, कॉन्स्टेबल विजयसिंग गिरासे, उपस्थित होते. हे मोबाईल लोहमार्ग पोलिसांनी ट्रेस केल्यानंतर ज्यांच्यावर या पूर्वी कोणताही गुन्हा नोंद नसलेल्या दुकानदार अथवा सामीन्य नागरिकांकडे आढळून आल्यामुळे कोणताही गुन्हा लोहमार्ग पोलिसांनी यांच्यावर दाखल केलेला नाही असे सांगितले. तर 2016 या चालू वर्षात वडाळा लोहमार्ग पोलिसांनी 238 प्रवाशांना आपले मोबाईल मिळवून दिले आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या