ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या पेटीएम कर्मचाऱ्यास महाराष्ट्र सायबर पोलिसांनी केली अटक

त्याने व्यावसायीकाचे पेटीएम अकाउंटचे पासवर्ड चोरून ते गैरकामासाठी वापरल्याचे पुढे येत आहे.

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या पेटीएम कर्मचाऱ्यास महाराष्ट्र सायबर पोलिसांनी केली अटक
SHARES

सोशल इंजिनिअरिंगचा वापर करून ऑनलाईन पेटीएम अपहार करणा-या पेटीएम कर्मचा-याचा महाराष्ट्र सायबर विभागातर्फे पर्दाफाश करण्यात आला. हा आरोपींने आतापर्यंत शेकडो छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांना गंडा घातल्याचे पोलिस तपासात पुढे आल्याची माहिती सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी दिली आहे.

हेही वाचाः- महिलांना लोकल प्रवास: रेल्वेला राज्य सरकारच्या उत्तराची प्रतिक्षा

मुंबईच्या अंधेरी भागातील दुग्ध व्यावसायिक राजेश मनसुख पटेल यांनी ०५ ऑक्टोंबरला महाराष्ट्र सायबर कडे तक्रार केली की दि.२० आँगस्ट ते  २0 सप्टेंबर रोजी त्याच्या पेटीएम अकांऊंट मधुन त्यांचे अपरोक्ष  ५० हजार ४४८ रुपये अज्ञात व्यक्तीने काढून घेतले आहेत. या तक्रारीवरून नोडल सायबर पोलीस ठाणे, महाराष्ट्र सायबर, मुंबई येथे भारतीय दंड विधान कलम ४२०, ३४ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० चे कलम ४३ (अ),६६, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होतात घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ नोडल सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्ह्याशी संबधीत बाबींची तपासणी, अभ्यास करून तांत्रिक पदधतीने  तपास करत संशयीत आरोपी एमडी,मुन्ना उर्फ मोहम्मद मुन्ना, पाशिउद्दीन अन्सारी, (२५) याला अटक केली. हा पेटीएम मध्ये फिल्ड सेल्स एक्झिकेटीव्ह म्हणून कार्यरत होता. त्याने व्यावसायीकाचे पेटीएम अकाउंटचे पासवर्ड चोरून ते गैरकामासाठी वापरल्याचे पुढे येत आहे.

हेही वाचाः- केंद्रातलं सरकार परदेशी नाही, मदत मागण्यात गैर काय?- उद्धव ठाकरे

नागरिकांना आवाहन

नागरीकांना महाराष्ट्र सायबर तर्फे  आवाहन करण्यात येते की. छोट्या व्यावसायिकाचे मर्चंट  वॉलेट अकाउंट उघडून देण्याच्या ,तसेच त्यांचा पासवर्ड सेट करून देण्याचे बहाण्याने त्यांचा पासवर्ड स्वतःकडे घेवुन अश्या मर्चंट वॉलेटचा वापर नंतर आर्थिक अपहारा करिता करीत असल्याचे समोर आले आहे. तरी सर्व लहान मोठ्या मर्चंट वॉलेटच्या ग्राहकांना सुचित करण्यात येते की, त्याच्या मोबाईल क्रमांकांचे मर्चट वाँलेट खाते इतर कोणी वापरत नाही ना? याची खात्री करून आपला पासवर्ड स्वतः बदलून तो स्वत: पुरता मर्यादीत ठेवावा व सतत बदलत राहावा.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा