सावधान..! 'चाइल्ड पॉर्नोग्राफी'तील काळ्या चेहऱ्यांपासून


सावधान..!  'चाइल्ड पॉर्नोग्राफी'तील काळ्या चेहऱ्यांपासून
SHARES
चाइल्ड पॉर्नोग्राफीवर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी हाती घेतलेल्या "ऑपरेशन ब्लॅक फेस' मोहिमेला चांगले यश मिळत आहे. ऑपरेशन ब्लॅक फेस अंतर्गत दोन महिन्यांत राज्यभरातून 1680 चाइल्ड पॉर्नोग्राफीची प्रकरणे शोधून काढली असून, आजपर्यंत 135 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर 48 जणांना अटक करण्यात आली आहे. ही मोहीम कायम चालू राहणार असून चाइल्ड पॉर्नोग्राफीवर पूर्णपणे नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. 

चाइल्ड पॉर्नोग्राफीत महाराष्ट्रात मुंबई शहर आघाडीवर आहे. येथे 653 तक्रारींत आता पर्यंत 92 गुन्ह्ये दाखल करण्यात आले आहेत. तर चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्याखालोखाल पुणे शहराचा क्रमांक लागतो. पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये 542 तक्रारींत यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात ही अशा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या सारख्या घटनांना आळा घालण्यासाठी गृहमंञी अनिल देशमुख यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र सायबर पोलिसांना अशा 
गुन्ह्यांना आळा घालण्याची जबाबदारी सोपवली आहे. सायबर पोलिसांनी आँपरेशन ब्लॅक फेस अंतर्गत मोहीम 5 जानेवारी 2020 पासून हाती घेतली. दोन महिन्यांत महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या पथकाने राज्यभरातून 1680 चाइल्ड पॉर्नोग्राफी संदर्भातील प्रकरणे समोर आणली आणि संबंधित शहर आणि जिल्हा पोलिसांना त्याबाबतचा अहवाल पाठवला. त्यानुसार राज्यभरात स्थानिक पातळीवर तपास करून 135 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात 48 जणांना अटक करण्यात आली आहे. बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. 

एनसीआरबीने दिलेल्या माहितीनुसार चाइल्ड पोर्नोग्राफीत दिल्लीनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात 1680 चित्रफिती इंटरनेटवर अपलोड झाल्याची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. सर्वाधिक 653 प्रकरणे मुंबईतून समोर आली असून त्या पाठोपाठ पुणे 542, ठाणे 94, नागपूर 64 तर नवी मुंबई 38 अशी संख्या आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 12 गुन्हे दाखल झाले असून नागपूर 9, औरंगाबाद 8, मुंबई 7, नागपूर ग्रामीण 6 गुन्हे दाखल आहेत. 

- चाइल्ड पॉर्नोग्राफीत दिल्लीनंतर महाराष्ट्राचा क्रमांक.
- 70 दिवसांत सापडली चाइल्ड पॉर्नोग्राफीची 1680 प्रकरणे.
- राज्यभरातून 48 जणांना केली अटक.
- देशात महाराष्ट्र सायबर पोलिसांची चांगली कामगिरी.
- ऑपरेशन ब्लॅक फेस अंतर्गत सोशल मीडियावर वॉच.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा