• चिमुरडीच्या विनयभंगप्रकरणी पानवाला अटकेत
SHARE

मालाड - एका 70 वर्षीय पानवाल्याने सहा वर्षांच्या चिमुरडीवर लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मालाडमध्ये घडली. याप्रकरणी मालाड पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मालाड परिसरात कुटुंबासह राहणाऱ्या चिमुरडीच्या इमारतीखाली पानवाल्याचं दुकान आहे. बुधवारी सकाळी मुलगी एकटीच खेळत असल्याचं बघून पानवाल्यानं तिला इमारतीच्या टेरेसवर नेत तिच्यावर लैगिक अत्याचार केला. मुलगी रडत रडत घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी पाक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलीय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या