मालवणीतून हेरॉईन जप्त

 Malad West
मालवणीतून हेरॉईन जप्त
Malad West, Mumbai  -  

सापळा रचून मालाड (प.) मालवणी पोलिसांनी हेरॉईन या अंमली पदार्थाचा साठा जप्त करत तिघांना अटक केली आहे. त्याची किंमत 2 लाख 76 हजार रुपये इतकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका कारमधून हे हेरॉईन आणलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलीस अधिकाऱ्यांनी मालवणीतल्या मार्वेरोडच्या डिव्हाईन शाळेजवळ तपासणी करत असता एका कारमध्ये पोलिसांना हेरॉईन या मादक पदार्थाची 1 हजार पाकिटं सापडली. त्याचे वजन 92 ग्राम आहे. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी आदिल शेख, इमरान सय्यद आणि नासिर लखानी या तीन आरोपींना अटक केली.

Loading Comments