मुंबई-दिल्ली फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा

तपासात सर्व धमक्या किंवा संदेश खोटे असल्याचे आढळून आले

मुंबई-दिल्ली फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा
SHARES

मुंबई (mumbai) ते दिल्ली विमानामध्ये (mumbai-delhi flight) बॉम्ब असल्याचा धमकीचा फोन (hoax call) दिल्ली नियंत्रण कक्षाला आला. याबाबत मुंबई पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली. महिलेला अडकवण्यासाठी हा कॉल केल्याचा संशय आहे. बॉम्बने विमान उडवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबईत आतापर्यंत 10 गुन्हे दाखल झाले आहेत.

गौरी बरवानी नावाची महिला मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानामध्ये प्रवास करत होती. ती मुंबईतील वर्सोवा येथे राहते. ती दिल्लीहून परदेशात जाणार असून तिच्याकडे 80 ते 90 लाख रुपये आहेत. तिच्याकडे दहशतवाद्यांचा पैसा आहे आणि ती मानवी बॉम्ब (human bomb) आहे, असा धमकीचा फोन आला. 

ती ओळखीच्या व्यक्तीला भेटण्यासाठी लंडनला जात असल्याची माहिती फोन (threat call)  करणाऱ्या अनोळखी व्यक्तीने दिली. दिल्ली नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर विमानतळ अधिकाऱ्यांनी तपास केला. महिलेला त्रास देण्याच्या उद्देशाने हे कॉल केल्याचा संशय आहे.

अलीकडच्या काही दिवसांत विमानांवर बॉम्बच्या धमकीचे संदेश मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. मुंबईत आठवडाभरात 10 गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी सहार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

विमानात बॉम्बची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नोंदवलेला हा 10वा गुन्हा आहे. या प्रकरणांचा समांतर तपासही गुन्हे शाखा करत आहे. सहार पोलिसांनी अज्ञात ट्विटर खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

या संदर्भात मंगळवारी ट्विटरवर अज्ञात व्यक्तीने धमकी दिली असून तपासात काहीही तथ्य आढळले नाही. गेल्या 10 दिवसांत मुंबई पोलिसांनी 10 प्रकरणे नोंदवली आहेत ज्यात विमानांमध्ये बॉम्ब असल्याबाबतचे संदेश किंवा ईमेल आले आहेत.

गेल्या आठवडाभरापासून धमकावण्याचे सत्र सुरू आहे आणि सर्व विमानातील प्रवासी आणि सामानाची कसून तपासणी करण्यात आली आहे. परंतु काहीही संशयास्पद आढळले नाही. योग्य चौकशी केल्यानंतर या धमक्या खोट्या असल्याचे निष्पन्न झाले.

देशातील विविध विमानांमध्ये बॉम्ब असल्याचेही रविवारी सांगण्यात आले. विस्तारा एअरलाइन्सला यूके 106 (सिंगापूर – मुंबई) आणि यूके 107 (मुंबई – सिंगापूर) सह त्याच्या सहा शेड्यूल फ्लाइटसाठी धमक्या मिळाल्या आहेत. अक्सा एअरला QP 102 (अहमदाबाद-मुंबई), QP 1385 (मुंबई-बागडोगरा), QP 1519 (कोची-मुंबई) आणि QP 1526 (लखनौ-मुंबई) यासह अनेक विमाने अलर्टवर ठेवण्यात आले होते.

6E58 (जेद्दा-मुंबई) आणि 6E17 (मुंबई-इस्तंबूल) सह इंडिगो एअरलाइन्सच्या सहा उड्डाणांवर सुरक्षा इशारा जारी करण्यात आला. सुरक्षेसाठी प्रत्येक विमान आणि प्रवाशांची तपासणी करण्यात आली. तपासात सर्व धमक्या किंवा संदेश खोटे असल्याचे आढळून आले.

टिश्यू पेपरवर लिहिलेला उदयपूर-मुंबई विमानामध्ये बॉम्ब असल्याचा दावा करणारा संदेश नंतर फसवा असल्याचे आढळून आले. या प्रकरणी सहार पोलिसांनी छत्तीसगडमधील 17 वर्षीय विद्यार्थ्याला अलीकडेच अटक केली आहे.



हेही वाचा

नोव्हेंबरमध्ये 'या' तारखेला संपूर्ण महाराष्ट्राला अतिरिक्त सुट्टी जाहीर!

बाबा सिद्दीकींचा मुलगा झीशान सिद्दीकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सामील

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा