रवी यादव (Ravi yadav) असे मृताचे नाव असून तो मूळचा डोंबिवलीचा (Dombivali) आहे. तो एका मल्टीनॅशनल औषध कंपनीत तो कामाला होता. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.
गोरेगाव पश्चिम येथील प्रेमनगर सोसायटी, म्हाडा कॉलनी येथे 24 जून रोजी यादवचा मृतदेह त्याच्या मैत्रिणीच्या फ्लॅटमध्ये आढळून आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो कधीकाळी या मैत्रिणीसोबत राहत असे. तो नेहमीप्रमाणे भेटण्यासाठी तिच्या फ्लॅटवर आला, असे तिने आपल्या जबाबात म्हटले आहे. रात्री 11 वाजेपर्यंत ती दुसऱ्या खोलीत होती. नंतर हॉलमध्ये प्रवेश केल्यावर तिला यादव पंख्याला दोरीने लटकलेला दिसला.
शेजारी राहणाऱ्या महिलेच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. मात्र,दोरी सैल होऊन मृतदेह जमिनीवर पडल्याने रक्तस्त्राव झाला. दरम्यान, दुसऱ्या एका शेजाऱ्याने सोसायटीच्या अध्यक्षांना याची माहिती दिली, त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांना यादवच्या मृतदेहावर दोरी आढळून आली. दोरी पोस्टमॉर्टम तपासणीसाठी जेजे रुग्णालयात (J.J. Hopital) पाठवण्यात आली आहे. याप्रकरणी मंगळवारी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
हेही वाचा