वांद्रे-वरळी सी लिंकवरून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न


वांद्रे-वरळी सी लिंकवरून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न
SHARES

गुरूवारी दुपारी अंदाजे १२ वाजता एका तरूणाने वांद्रे-वरळी सी लिंकजवळील समुद्रात उडी मारून आत्महत्येच्या प्रयत्न केला. सी लिंकच्या पोल ९० जवळ या तरूणाने पाण्यात उडी घेतली. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरूणाचं नाव निखर जगदीश शाहू (३१) असं असून तो मूळचा मध्य प्रदेशातील फत्तेपूरच्या हातगावमध्ये राहणारा आहे. त्याला उपचारासाठी परळच्या केईएम रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. 

फोटो काढण्याच्या निमित्ताने निखर टॅक्सीतून सी लिंकवर आला. सी लिंकवर आल्यावर त्याने टॅक्सी चालकाला टॅक्सी हळू चालवण्यास सांगितलं. त्यानंतर निखर खाली उतरला आणि टॅक्सी चालकाला काही कळण्याच्या आत समुद्रात उडी घेतली. या प्रकाराची माहिती टॅक्सी चालकाने पोलिसांना दिली. या तरूणाचा कोळी बांधवांच्या माध्यमातून शोध घेण्यात आला. सुदैवाने समुद्राला भरती नसल्याने त्याला यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मागच्या काही महिन्यांपासून वांद्रे-वरळी सी लिंकवरून आत्महत्या करणाऱ्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे हळुहळू वांद्रे-वरळी सी लिंक सुसाईड पाॅईंट बनत चालला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा