'हा' व्हिडिओ पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल


'हा' व्हिडिओ पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल
SHARES

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. हा संतापजनक व्हिडिओ व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहे. कुत्र्याला मारतानाचा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. अनेकांनी ट्वीटर आणि सोशल मीडियावर या व्हिडिओचा विरोध केला आहे. लोकांकडून होणारा विरोध पाहता युट्यूबनं हा व्हिडिओ काढून टाकला आहे.

मुंबई मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, ठाण्यात एका निर्दयी व्यक्तीनं एका कुत्र्याला गाडीखाली चिरडून मारल्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.


या व्हिडिओत तुम्ही बघू शकता, की कशाप्रकारे या कुत्र्याची हत्या करण्यात आली. आधी त्याला गाडीनं उडवून मारण्याचा प्रयत्न केला. कुत्रा ओरडत होता, तडफडत होता. पण या संवदनाहीन व्यक्तीला काहीच फरक पडला नाही. कुत्रा जिवंत असल्याचं पाहून त्या व्यक्तीने पुन्हा गाडी मागे नेली आणि पुन्हा एकदा कुत्र्याच्या अंगावर चढवली. यावेळी मात्र गाडी कुत्र्याच्या डोक्यावरून जाते आणि त्या कुत्र्याचा जागीच मृत्यू होतो. ही घटना एक व्यक्ती आपल्या डोळ्यांनी पाहत असते. पण ती व्यक्तीही गाडीवाल्याला अडवण्याचा प्रयत्न करत नाही.

२४ ऑक्टोबरचा हा व्हिडिओ आहे. गिरीश संत हा व्यक्ती या कारमध्ये असल्याचं बोललं जात आहे. जेव्हा पशुप्रेमींना ही बातमी कळली, तेव्हा त्यांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. गिरीश संत हा सध्या फरार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, आता या दोन्ही घटना पाहता माणुसकी संपत चालली आहे का? असा प्रश्न निर्माण केला जात आहे.



हेही वाचा

'लोन वूल्फ'वर मुंबई पोलिसांची करडी नजर!


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा