अज्ञाताकडून वयोवृद्ध व्यक्तीची हत्या

 Ghatkopar
अज्ञाताकडून वयोवृद्ध व्यक्तीची हत्या

घाटकोपर पूर्व येथील प्रियदर्शनी सेवा संघाजवळील नाल्यात बुधवारी एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोहचून पंचनामा करून पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवली आहे. मृत व्यक्तीचे नाव मुस्तफा अली खान(65) असून, ती घाटकोपर पूर्व येथील प्रियदर्शनीनगर झोपडपट्टीत राहते.मृत व्यक्तीचा गळा चिरून त्याची हत्या करण्यात आली असल्याचे पंतनगर पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी शव विच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवले आहे. पंतनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात हत्या करण्याचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती पंतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रफुल्ल फडके यांनी दिली.

Loading Comments