रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकच्या रेलिंगला गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या

पोलिसांनी मृत व्यक्तीच्या ताब्यातून एक सुसाइड नोट जप्त केली आहे.

रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकच्या रेलिंगला गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या
SHARES

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात मंगळवारी एका २५ वर्षीय तरुणाने स्कायवॉकवर गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, कल्याण रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकच्या रेलिंगला त्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पहाटे 4 च्या सुमारास घडली.

विठ्ठल मिसाळ असे मृताचे नाव असून तो मूळचा बीडचा रहिवासी आहे. एमएफसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदिप पाटील यांनी सांगितले की, त्या व्यक्तीने आपल्या कुटुंबीयांना दूरध्वनी करून आपण आत्महत्या करणार असल्याची माहिती दिली होती.

सरकारी राखीव पोलिसांचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा तो माणूस आधीच मृत झाला होता, असे ते म्हणाले.

पोलिसांनी मृत व्यक्तीच्या ताब्यातून एक सुसाइड नोट जप्त केली आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले आहे.

तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणीही आत्महत्येच्या विचारांशी झुंज देत असल्यास, येथे मदत घ्या:

Mental Health Helplinesहेही वाचा

उल्हासनगर: कुत्र्यावर बलात्कार, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल

मुंबई विमानतळावर 'इंडियन मुजाहिदीन'कडून धमकीचा कॉल, यंत्रणा सतर्क

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा