मालाडमध्ये प्रियकराचा विवाहितेवर बलात्कार

 Pali Hill
मालाडमध्ये प्रियकराचा विवाहितेवर बलात्कार

मालाड - प्रियकराने चाकूचा धाक दाखवत विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना मालाडच्या कुरारमध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलेने 17 जानेवारीला कुरार पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचे विवाहापूर्वी आरोपी सलीम खलिफा यांच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र महिलेच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसरीकडे लावून दिलं. त्यानंतर सलीमनेही विवाह केला. मात्र सलीमने काही दिवसांपूर्वी विवाहितेला मालाडच्या त्रिवेणीनगरमध्ये फिरताना पाहिलं आणि सलीमने तिचा पाठलाग केला. तेव्हा ती आपल्या मावशीकडे गेली होती. त्यानंतर सलीम तिच्यावर नजर ठेवून होता. मागच्या वर्षी 31 डिसेंबरला महिला घरात एकटीच असल्याचा फायदा घेत सलीमने घरात घुसून महिलेला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी महिलेने तक्रार दाखल केली नाही. पण जेव्हा सलीम पुन्हा तिच्या घरी आला तेव्हा याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केली. पोलिसांनी सलीमविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहेत.

Loading Comments