धारावीत देशी कट्ट्याने गोळी झाडून एकाची हत्या

 Dharavi
धारावीत देशी कट्ट्याने गोळी झाडून एकाची हत्या

धारावी - देशभरात एकीकडे धुलीवंदनाचा उत्साह असताना मुंबईतील धारावीत मात्र देशी कट्ट्याने गोळ्या झाडून एकाची हत्या करण्यात आली आहे. इथल्या मिलन हॉटेलजवळ असलेल्या झोपडपट्टीतल्या वखार गल्लीत ही हत्या झाली आहे. 

यात मृतकाची अद्याप ओळख पटलेली नाही. धारावी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळावर पोहचले असून गुन्हे शाखेचे अधिकारीही मारेकऱ्याचा शोध घेत आहेत. 

घटनास्थळावर पोलिसांना या कट्ट्याचे रिकामे काडतूस मिळाले आहे. कोणत्या कारणासाठी ही हत्या करण्यात आली हे कळेपर्यंत कोणतीही माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

Loading Comments