२६/११ कटू आठवणी: 'असा' झाला हाेता मुंबईवर दहशतवादी हल्ला

मुंबईवरील दहशतवादी हल्ला झाला कसा? दहशतवादी नेमके कुठून घुसले आणि त्यांनी माजवलेला हाहाकार आणि त्यानंतर सैन्य दलानं त्यांचा केलेला खात्मा याचा घेतलेला हा आढावा...

२६/११ कटू आठवणी: 'असा' झाला हाेता मुंबईवर दहशतवादी हल्ला
SHARES

२६ नोव्हेंबर २००८ हा दिवस मुंबईच नाही, तर संपूर्ण देशाच्या इतिहासातील काळा दिवस ठरला. या हल्ल्यामुळे दहशतवादाची खरी 'दहशत' मुंबईसोबत संपूर्ण जगानंही अनुभवली. दहशतवादी हल्ला झाला कसा? दहशतवादी नेमके कुठून घुसले आणि त्यांनी माजवलेला हाहाकार आणि त्यानंतर सैन्य दलानं त्यांचा केलेला खात्मा याचा घेतलेला हा आढावा...

हल्ला हा २६ नोव्हेंबर २००८ च्या संध्याकाळी सुरु झाला असला, तरी त्याची सुरवात २१ नोव्हेंबरपासून पाकिस्तानातून झाली

२१ नाेव्हेंबर रोजी संध्याकाळी हत्यारांसह १० दहशतवादी कराची बंदरावरून निघाले. प्रत्येकाकडे एके ४७ रायफल, ६ ते ७ मॅगझिन्स, तब्बल ४०० राऊंड्स, ८ हॅन्ड ग्रेनेड्स देण्यात आले होते. त्यांच्या जोडीला क्रेडिट कार्ड आणि खायला ड्राय फ्रूटस देखील होते.

तब्बल ३८ तास प्रवास केल्यानंतर २३ नाेव्हेंबरला या १० दहशतवाद्यांनी कुबेर नावाची बोट हायजॅक केली. त्यातील ४ खलाशांना मारून ते कप्तानासहित बोट घेऊन मुंबईच्या दिशेने येऊ लागले.


  • २६ नाेव्हेंबरला मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून ७ मैलावर असताना त्यांनी कुबेरच्या कप्तानाची हत्या केली आणि मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु ठेवला.
  • समुद्र किनाऱ्याजवळ पोहोचल्यानंतर ६ दहशतवादी बधवार पार्क, कफ परेड परिसरात उतरले. तर उर्वरित चौघांनी समुद्रालगत आपला प्रवास सुरु ठेवला.



  • २६ नोव्हेंबरला रात्री ८.३० नंतर प्रत्यक्ष हल्ल्याला सुरतवात झाली.
  • दोन दहशतवादी कुलाब्यातील 'लिओपोल्ड कॅफे' रेस्टाॅरंटमध्ये घुसले आणि त्यांनी अंदाधुंद फायरिंग करण्यास सुरवात केली.



  • त्यानंतर ४ दहशतवादी ताज महाल हॉटेलात २ दहशतवादी ओबेरॉय ट्रायडंटमध्ये, २ नरीमन हाऊस मध्ये, तर अजमल कसाब आणि त्याचा साथीदार इस्माईल हा टॅक्सीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने निघाले.
  • एके ४७ घेऊन छत्रपती सीएसटीएम स्थानकात घुसून कसाब आणि इस्माईलने अंदाधुंद फायरिंग सुरु केली. तब्बल ५२ निष्पापांची हत्या केल्यानंतर आणि १०९ जणांना जखमी केल्यानंतर कसाब आणि इस्माईल कामा रुग्णालयाच्या दिशेने निघाले.




  • कामा रुग्णालयाच्या गल्लीत असताना कसाब आणि त्याचा साथीदारांचा सामना एटीएस चीफ हेमंत करकरे, साळसकर आणि कामटे यांच्याशी झाला या तिघांनी कसाब आणि त्याच्या साथीदारांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडील एके ४७ समोर त्यांचं काहीही चाललं नाही. मुंबई पोलिसांचे हे तिघे शूरवीर धारातीर्थी पडले.




  • त्यानंतर दोघांनी एक गाडी हायजॅक केली आणि चौपाटीच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. त्यानंतर गिरगाव चौपाटी जवळ इस्माईलचा पोलिसांनी खात्मा केला, तर अजमल कसाबला पकडण्यात पोलिसांना यश आलं.
  • एव्हाना ताज महाल हॉटेलासह ट्रायडंट आणि नरीमन हाऊसमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांनी देखील हाहाकार माजवण्यास सुरवात केली होती.
  • मुंबई पोलिसांनी या तिन्ही इमारतींना वेढा घातला होता; पण दहशतवाद्यांना सामना करणं त्यांना जमत नव्हतं. लष्कराचे जवान आणि एनएसजी कमांडो येताच त्यांनी मोर्चा सांभाळला.


ऑपरेशन ताज महल



  • रात्री अडीच वाजता लष्कराचे जवान ताज महल हॉटेलात दाखल झाले. तोवर दहशतवाद्यांनी हॉटेलला आग लावली होती. दोघांकडून चकमकीला सुरवात झाली.
    शेकडो जणांना हॉटेलमधून यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलं.
  • लष्कराचं ऑपेरेशन सुरु असतानाच फायर ब्रिगेड आग विझवण्याचा शर्थीचे प्रयत्न करत होतं.



  • पहाटे ५ वाजता एनएसजी कमांडोने मोर्चा सांभाळला. तब्बल ५० तासांच्या ऑपेरेशननंतर एनएसजीने ताजमध्ये घुसलेल्या ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळवलं.
  • ताज महल हॉटेलामध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला. तर एक कमांडो देखील शाहिद झाला.


ओबेरॉय ट्रायडंट



  • २७ नाेव्हेंबरच्या पहाटेपर्यंत एनएसजी कमांडोने ट्रायडंट हॉटेलचा ताबा घेतला.
    परदेशी पाहुण्यांची सुटका करत एनएसजी कमांडो हॉटेलमध्ये आत घुसले.
  • २७ नाेव्हेंबरच्या संध्याकाळी एनएसजी कमांडोच्या मदतीला शीख रेजिमेंट दाखल झाली.
  • दहशतवादी आणि एनएसजी कमांडोमध्ये भीषण चकमक झाली. दहशतवाद्यांनी ग्रेनेड्सचा देखील वापर केला
  • २८ नाेव्हेंबर दुपारी ३ वाजता दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करून संपूर्ण हॉटेलवर नियंत्रण मिळवलं.
  • हॉटेल ट्रायडंटमधून कमांडोंनी १४३ बंधकांना वाचवलं, तर २४ जणांचा मृत्यू झाला.


नरीमन हाऊस



  • नरीमन हाऊसमध्ये घुसून दहशतवाद्यांनी ६ जणांना बंधक बनवलं. बराच वेळ इथं मुंबई पोलिसांनी मोर्चा सांभाळला. पण एनएसजी कमांडो येताच सूत्र त्यांच्याकडे सोपवली.
    २७ तारखेला मध्यरात्री एनएसजी कमांडोंनी नरीमन हाऊसमधून ९ बंधकांची सुखरूप सुटका केली.
  • २८ नोव्हेंबरला सकाळी एनएसजी कमांडो हेलिकॉप्टरच्या मदतीने नरीमन हाऊसच्या टेरेसवर उतरले.
  • रात्री ८.३० च्या सुमारास दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा कारण्यात एनएसजी कमांडोना यश आलं
  • इमारतीच्या पाहणीत आतंकवाद्यानी बंधक बनवलेल्या ६ जणांचा मृतदेह सापडला.




दरम्यान मुंबई पोलिसांनी नाकाबंदी करून अजमल कसाबला यशस्वीरित्या गिरगाव चौपाटी इथं पकडलं. या घटनेत पोलीस काॅन्स्टेबल तुकाराम ओंबाळे शहीद झाले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा