आॅर्थर रोड कारागृहात कैद्याने घेतला गळफास


आॅर्थर रोड कारागृहात कैद्याने घेतला गळफास
SHARES

दक्षिण मुंबईतील आॅर्थर रोड कारागृहातील एका कैद्याने सोमवारी आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. साबिरअली गरीबुल्ला शेख (२६) असं या कैद्याचं नाव असून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं कारागृह अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.


कधी केली आत्महत्या?

कारागृह अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साबिरअली याने सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी कुठलीही सुसाईड नोट सापडली नसून याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे.


आधीही आत्महत्येचा प्रयत्न

तर, मुंबई पोलिसांच्या जनसंपर्क कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, साबिरअली हा कैदी मानसिक रुग्ण होता. त्याच्यावर मागील साडेतीन महिन्यांपासून मानसिक आजारावरील उपचार देखील करण्यात येत होते. त्याने याआधीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु कारागृहातील सतर्क कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवलं होतं.

साबिरअलीला एमआयडीसी पोलिसांनी ३०२,३०७,३२६ आणि १४७ कलमांखाली अटक केली होती. त्याच्यावर हत्येच्या ३ गुन्ह्याची नोंद होती. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं होतं. मागील ३ वर्षांपासून तो कारागृहातच होता.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा