मुंबई पोलीस माणुसकी विसरलेत?


SHARES

बोरिवली - 27 ऑक्टोबरला रात्री घडलेल्या एका प्रसंगानं पोलिसांच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. वेदनेने विव्हळणाऱ्या महिलेला उपचारासाठी घेऊन जायचे सोडून पोलिसांनीच बघ्याची भूमिका घेतली.
बोरिवली लिंकरोडवर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार महिलेला कारची जोरदार धडक बसल्यानं तिच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर ती जवळजवळ अर्धातास वेदनेने व्याकूळ होऊन रस्त्याच्या किनारीच पडून राहीली. मात्र एकही अॅम्ब्युलन्स तिथं पोहचली नाही. पोलिसांचं म्हणणं होतं की अॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली असून ती आल्यानंतरच पीडितेला रुग्णालयात नेणार. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहे की रस्त्यावर अपघात घडल्यास पीडित व्यक्तीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केलं जावं. समोरच इतके पोलीस असतानाही अपघातग्रस्त महिलेला रुग्णालयात नेण्याची तसदी कुणी दाखवली नाही. त्यामुळं पोलिसांच्या देखत एक अपघात होतो. मात्र पोलीस त्या वाहनचालकाला अडवू शकले नाहीत. असे अनेक सवाल निर्माण झाले आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा