म्हाडाच्या सी विभागातील उपअभियंत्याला लाच घेताना अटक


म्हाडाच्या सी विभागातील उपअभियंत्याला लाच घेताना अटक
SHARES

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या सी-३ विभागातील कार्यकारी अभियंत्याला २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विरोधी पथका (एसीबी)ने रंगेहाथ पकडलं. ही घटना ताजी असतानाच सी विभागातील म्हाडाच्या उपअभियंत्यासह आणखी एकाला लाच घेताना लाचलूचपत विरोधी पथकानं अटक केली आहे.

अमोल सुरेशराव बुधकोंडवार (३८) असं या उपअभियंत्याचं असून तसंच, मोहम्मद शहनवाझ शमशूल शेख (३३) असं त्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे. दुरुस्तीच्या कामाकरत ना हरकत प्रमाणापत्र देण्यासाठी या उपअभियंत्याने तक्रारदार कंत्राटदाराकडून १८,००००० रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी दोघांना लाचलुचपत विरोधी पथकानं सापळा रचून अटक केली आहे.


नेमकं प्रकरण काय?

तक्रारदार कंत्राटदार हे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचं व्यवसाय करतात. या कंत्राटदारानं अल्पाईवाला बिल्डिंग, धोबी तलाव या इमारतींच्या पुनर्विकासाचं काम हाती घेतलं होत. परंतु, या जागेचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडा कार्यालयात कंत्राटदारानं ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता. याच प्रमाणपत्राकरता उपअभियंतानं कंत्राटदाराकडे १८००००० रुपयांची मागणी केली होती.

त्या उपअभियंतानं ही रक्कम कंत्राटदाराला एका खासगी व्यक्तीकडे देण्यासाठी सांगितलं. त्यावेळी कंत्राटदारानं १३५०००० रुपये इतकी लाचेची रक्कम त्या व्यक्तीला दिली. त्यानंतर ही रक्कम उपअभियंतानं त्या व्यक्तीकडून घेतली. याप्रकरणी खासगी व्यक्तीला लाचेच्या रक्कमेसह आणि उपअभियंताला या दोघांना ताब्यात घेतलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा