अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार

 Mumbai
अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार

पवई - अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना पवईमध्ये उघडकीस आलीय. याप्रकरणी पवई पोलिसांनी एका आरोपीला अटक केलीय. हा नराधम दुसरा तुसरा कुणी नाही तर तिच्याच परिसरात राहणारा होता. या नराधमानं मुलीसोबत आधी ओळख वाढवली. त्यानंतर मित्राच्या मदतीनं तिला पळवून नेलं. कुटुंबियांनी या तरूणाची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी मुलीला ताब्यात घेत या नराधमाच्या मुसक्या आवळल्या. मुलीच्या वैद्यकिय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचं उघड झालंय.

Loading Comments