व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी गृहनिर्माण मंत्र्यांच्या माजी सचिवाला अटक

पोलिसांनी ३ डिसेंबरला अपहरणाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी २५ जणांची चौकशी केली. त्यानंतर राजेश्वर यांच्या मोबाईल रेकॉर्डनुसार मेहता यांचा माजी स्वीय सचिव सचिन पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसंच सापडलेली कार ही त्याचीच असल्याची माहिती उघड झाली. आर्थिक व्यवहारातून ही हत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला आहे.

व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी गृहनिर्माण मंत्र्यांच्या माजी सचिवाला अटक
SHARES

घाटकोपर येथील एका व्यापाऱ्याचा मृतदेह पनवेलजवळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या व्यापाऱ्याचं अपहरण करून त्याची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या माजी स्वीय सचिव पोलिसांनी अटक केली आहे. सचिन पवार असं या आरोपीचं नाव आहे. सध्या गुन्हे शाखेचे पोलिस आणि पंतनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी या संदर्भात अधिक तपास करत आहेत.


कधी झाले होते बेपत्ता?

पंतनगर परिसरत राहणारे राजेश्वर किशोरलाल उदानी (५७) यांचं घाटकोपर परिसरात सोने विक्रीचं दुकान आहे. उदानी २८ नोव्हेंबर रोजी कामानिमित्त घराबाहेर जात असल्याचं सांगून घराबाहेर पडले. मात्र दुसरा दिवस उजाडला तरी ते घरी आले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी पंतनगर पोलिसांत ते बेपत्ता असल्याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तपासादरम्यान राजेश्वर यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहरे परिसरात आढळून आला.


'इथं' सापडला मृतदेह

राजेश्वर ज्या कारमधून निघाले होते, ती स्विफ्ट डिझायर कार २९ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता घाटकोपर पूर्वेकडील पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या विक्रोळी वाहतूक चौकीसमोर सापडली. त्यानंतर ३ डिसेंबरला पनवेल येथील नेहरे परिसरात एक बेवारस कुजलेला मृतदेह आढळून आला. त्या मृतदेहावरील शर्टमुळे हा मृतदेह राजेश्वर यांचा असल्याचं नातेवाईकांनी ओळखलं. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पनवेल येथील रुग्णालयात पाठविण्यात आला.


'असं' घेतलं ताब्यात

या प्रकरणी पोलिसांनी ३ डिसेंबरला अपहरणाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी २५ जणांची चौकशी केली. त्यानंतर राजेश्वर यांच्या मोबाईल रेकॉर्डनुसार मेहता यांचा माजी स्वीय सचिव सचिन पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसंच सापडलेली कार ही त्याचीच असल्याची माहिती उघड झाली. आर्थिक व्यवहारातून ही हत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला आहे.


भाजपाचे पदाधिकारी

पवार २००९ ते २०१० दरम्यान मेहता यांचे स्वीय सचिव होते. त्यानंतर ते भाजपाच्या स्थानिक वर्तुळात कार्यरत होते. भाजपाचे पदाधिकारी असलेले सचिन पवार हे घाटकोपरमधील मोठं प्रस्थ असल्याचं समजतं आहे. एवढंच नाही, तर पवार यांच्या पत्नीला भाजपाकडून महापालिकेचं तिकीट देण्यात आलं होतं.हेही वाचा-

नीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार

अभिनेत्री झरीन खानची माजी मॅनेजरविरोधात खार पोलिसांत तक्रारRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा