अभिनेत्री झरीन खानची माजी मॅनेजरविरोधात खार पोलिसांत तक्रार

अंजली अथ झरीनसाठी मॅनेजर म्हणून काम करत होती. मात्र काही वर्षांनी अंजलीने झरीनच्या व्यवस्थापनाचं काम सोडल्यापासून दोन्हीमध्ये एका व्यवहारावरून वाद सुरू होते. वाद विकोपाला गेल्यानंतर झरीनला अंजलीने वेश्या म्हणून संबोधलं. या प्रकरणी गुरुवारी संध्याकाळी झरीनने खार पोलिस ठाण्यात अंजली विरोधात तक्रार नोंदवली.

अभिनेत्री झरीन खानची माजी मॅनेजरविरोधात खार पोलिसांत तक्रार
SHARES

अभिनेत्री झरीन खानला हिला वेश्या म्हणून हिणावल्याप्रकरणी झरीनने तिच्या माजी मॅनेजरविरोधात खार पोलिस ठाण्यात चारित्र्यहनन केल्याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे. अंजली अथ असं या महिला आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी खार पोलिस अधिक तपास करत असून पोलिसांनी अथ हिला चौकशीसाठी बोलावलं आहे.


तक्रारीत काय म्हणलंय?

अंजली अथ झरीनसाठी मॅनेजर म्हणून काम करत होती. मात्र काही वर्षांनी अंजलीने झरीनच्या व्यवस्थापनाचं काम सोडल्यापासून दोन्हीमध्ये एका व्यवहारावरून वाद सुरू होते. ''अंजलीसोबतचा करार संपुष्टात आल्यावर अंजलीने मला फोनवर धमकीचे आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवले. माझ्याविषयी खोट्या बातम्या पसरवल्या. एवढंच नाही, तर आपल्या नावाचा वापर करत अंजलीने सिनेसृष्टीतील लोकांकडून पैसे घेतल्याचा आरोप''ही झरीनने तक्रारीत केला आहे.


वाद विकोपाला

वाद विकोपाला गेल्यानंतर झरीनला अंजलीने वेश्या म्हणून संबोधलं. या प्रकरणी गुरुवारी संध्याकाळी झरीनने खार पोलिस ठाण्यात अंजली विरोधात भा.द.वि ५०९ कलमा (महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने शब्दोच्चार किंवा कृती करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

झरीनने २०१० साली अभिनेता सलमान खान याच्यासोबत वीर या चित्रपटापासून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. तेव्हापासून अंजली तिची मॅनेजर होती. झरीनने राज, हाऊसफूल २, हेट स्टोरी ३, अकसर २ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.



हेही वाचा-

नीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार

नवीन पोलिस ठाणी अडकली लालफितीत



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा