चेंबूरमधून दोन मुली बेपत्ता

 Chembur
चेंबूरमधून दोन मुली बेपत्ता

चेंबूर - महात्मा फुले नगर परिसरात राहणाऱ्या दोन सख्या बहिणी तीन दिवसांपासून बेपत्ता आहेत. दोघी बहिणी क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. मात्र त्या घरी परतल्या नाहीत. या दोन मुली आईसोबत राहत होत्या. एक मुलगी दहावीत तर दुसरी मुलगी तेरावीत शिकत होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत मुलींचा शोध सुरू केला आहे.

Loading Comments