महाराजांबद्दल अपशब्द, मनसेनं केलं खळ खट्याक...

छ. शिवाजी महाराजांच्या पुकळ्याला अनुसरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तिचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यानंतर मनसेकडून याप्रकाराचा जाहिर निषेध केला.

महाराजांबद्दल अपशब्द, मनसेनं केलं खळ खट्याक...
SHARES

मुंबईच्या खार येथील एका स्टुडिओत स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तिच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसेने स्टुडिओची मोडतोड केली. जोशुआचा तो व्हिडिओ प्रचंड वायरल झाला. सोशल मिडियावरूनही तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यानंतर जोशुआने लेखी स्वरुपात माफी मागितली.

खार येथे एका स्टुडिओत स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हीने अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छ. शिवाजी महाराजांच्या पुकळ्याला अनुसरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तिचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यानंतर मनसेकडून याप्रकाराचा जाहिर निषेध केला. ऐवढ्यावरच न थांबता मनसैनिकांनी संबधित स्टुडिओची मोडतोड ही केली. तसेच त्या मोडतोडीचे यश रानडे यांनी फेसबुक लाईव्ह करून तोडफोडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच यश रानडे हे जोशुआला लिखित स्वरूपात माफीदेखील मागण्यास सांगितलं होतं दरम्यान, मनसेच्या इशाऱ्यानंतर अग्रिमा जोशुआ हिनं लिखित स्वरूपात माफीनामाही सादर केला आहे. याशिवाय ट्वीटरवरूनही महाराजांबद्दलच्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागीतली आहेत. तेथेही नेटक-यांनी तिला चांगलेच धारेवर धरून ट्रोल केले आहे. शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर कायदेशी कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्याबाबत त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी ही पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले जाते.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा