मराठी अभिनेत्रीकडून कॉम्प्रमाइजची मागणी करणाऱ्या परप्रांतीयांना मनसेनं चोपलं

एका मराठी अभिनेत्रीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष पद्मनाभ राणे यांना फोन करून यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली होती.

मराठी अभिनेत्रीकडून कॉम्प्रमाइजची मागणी करणाऱ्या परप्रांतीयांना मनसेनं चोपलं
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी ठाण्यातील घोडबंदर इथं मुलींना चित्रपटामध्ये रोल देतो, असं सांगून त्यांचा गैरफायदा घेणाऱ्या परप्रांतीयांना चांगलाच चोप दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीच यासंदर्भातील माहिती दिली आहे.

मराठी अभिनेत्रीचा गैरफायदा घेण्याचा उत्तर प्रदेशमधील या तरुणांनी प्रयत्न केल्याचं सांगत मनसेच्या कार्यकर्त्यांनी या चौघांना रंगेहाथ पकडलं. एवढंच नागी तर चोप दिल्यानंतर त्यांनी या चौघांना पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

आपल्या फेसबुक पेजवरून काही व्हिडीओ अमेय खोपकर यांनी शेअर केले आहेत. एका व्हिडीओमध्ये खोपकर यांनी संपूर्ण प्रकार काय आहे याची माहिती दिली. एका मराठी अभिनेत्रीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष पद्मनाभ राणे यांना फोन करून यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली होती.

या अभिनेत्रीनं दिलेल्या माहितीनुसार तिला चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका देण्यात आल्याचं सांगितलं. पण हा रोल हवा असेल तर उद्या या चित्रपटाचे निर्माते लखनऊमधून मुंबईत येणार आहेत. तर तुला त्यांना खूष करावं लागेल, तुला कॉम्प्रमाइज करावं लागेल. असं केलं, तरच तुला त्या मोठ्या चित्रपटात रोल दिला जाईल, असं या अभिनेत्रीला सांगण्यात आल्याचं खोपकर म्हणाले. या अभिनेत्रीनं घरच्यांना विश्वासात घेऊन त्यांना सगळं सांगितलं. त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना याबाबत कळवल्यानंतर या लोकांना ट्रॅप करण्यात आलं.

जेव्हा ही मुलगी घोडबंदर रोड येथील एका फार्म हाऊसवर गेली, तेव्हा मनसेचे पदाधिकारीही तेथे पोहचले. मनसे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनी या चौघांना चांगलाच चोप दिला. या चौघांकडे देशी कट्टेपण सापडले आहेत. गिरिजेश यादव, बिरालाल यादव, राहुल यादव आणि कंचन यादव अशी या चौघांची नावं असल्याचं खोपकर यांनी सांगितलं.

“अशी माणसे उत्तर प्रदेश, बिहारमधून येतात आणि आपल्या मुलींना खराब करण्यासाठी त्यांना नको नको त्या चित्रपटांमध्ये काम देण्याचे आमिष दाखवले जाते. पण या मुलीची दाद दिली पाहिजे कारण तिने यांच्याविरोधात उभे राहण्याचा निर्णय घेतला. हे असे नराधम लोकांसमोर आले पाहिजेत. आज मी आवाज नाही उठवला, तर हे लोक अशा किती महिलांवर आत्याचार करतील सांगता येत नाही. तिच्या या एका आवाजासाठी आम्ही इथं एकत्र येऊन या लोकांना चोप दिला,” अशी माहिती राणे यांनी दिली आहे.



हेही वाचा

शिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक, डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप

गर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा