थर्टीफस्टच्या पार्श्वभूमिवर पोलिस अॅक्शन मोडवर, ८ कोटीचा हुक्का पकडला


थर्टीफस्टच्या पार्श्वभूमिवर पोलिस अॅक्शन मोडवर, ८ कोटीचा हुक्का पकडला
SHARES

मुंबईत थर्टीफस्टच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी धडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री पार्ट्यांसाठी आणलेला हुक्का पोलिसांनी जप्त केला आहे. बाजारात या हुक्क्याची किंमत ही ८ कोटींपेक्षा जास्त आहे. गोरेगाव पूर्व भागातून हे हुक्क्यांचे फ्लेवर्स जप्त करण्यात आले आहेत. जवळपास ८० पेक्षा जास्त प्रतिबंधित हुक्क्यांचे फ्लेवर्स यांत असून हे साडेतीन टन हुक्का फ्लेवर्स एकावेळेस १ लाख ५० हजार जण घेवू शकतात.

हेही वाचाः- रेस्टॉरंट आणि बार परवाना शुल्कात ५० टक्क्यांची कपात

यंदा मुंबईत थर्टी फस्ट दरम्यान नाईट कर्फ्यु असल्याने घरपोच किंवा छुप्या हुक्का पार्लर मध्ये मोठ्या प्रमाणात हे हुक्का फ्लेवर्स पोहोचवले जाणार होते अशी माहिती तपासात समोर आली आहे. तर धक्कादायक म्हणजे तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर्स पाकिटावर धोक्याची सुचना लिहणे बंधनकारक असतानाही जवळपास ८४ किलो तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर्स पाकिटांवर कोणतिही धोक्याची सूचना लिहीली नव्हती.  हे हुक्का फ्लेवर्स बेकायदेशीरपणे जयकिशन अग्रवाल याने साठवून ठेवले होते. २३ डिसेंबर २०२० रोजी गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्हेशाखेचे पोलिस आणि पोलिसांच्या समाजसेवा शाखेने संयुक्त कारवाई केली. मुकादम कंपाउंड, जनरल ए. के. वैदय मार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई या ठिकाणी छापा टाकला होता. मुंबईत मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन केले जाते अशा पार्ट्यांमध्ये तसच हुक्का पार्लरमध्ये तंबाखुजन्य हुक्क्याची मोठी मागणी असते त्याकरता डिसेंबर महिन्याच्या आधीच मोठ्या प्रमाणात तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर्सची अवैध रित्या तस्करी करुन ते लपवून ठेवले  असल्याचे तपासात निष्पन्न झाले. ३१ डिसेंबर पार्ट्यांच्या आधीच विविध अवैध मार्गांनी हे प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स हुक्का पार्लर मध्ये पोहोचवले जातात.

हेही वाचाः- राज ठाकरेंना कोर्टाकडून नोटीस, मनसे-अॅमेझॉन वाद चिघळला

या प्रकरणी कुरार पोलीस ठाणे येथे सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने (प्रतिबंध) अधिनियम सन २०१८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असूल गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक गुन्हयाचा तपासकरीत आहे. ही कारवाई पोलीस सह आयुक्‍त मिलींद भारंबे आणि अप्पर पोलीस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सपोआ संजय पाटील, पोनि पोखरकर व पो. उप. नि. बिपीन चव्हाण यांच्यासंयुक्त पथकाने केलीये.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा