गांजा तस्करीप्रकरणी दोघांना अटक

मुंबईत पश्चिम उपनगरात नामांकित महाविद्यालये आहेत. उच्चभ्रू सोसायटी आणि महाविद्यालयातील विद्यार्थी गांजाचं व्यसन करत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

गांजा तस्करीप्रकरणी दोघांना अटक
SHARES

मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने महाविद्यालयीन तरुणांना गांजाची तस्करी करणाऱ्या तस्कराला अटक केली आहे. सुनिल दास असं या तस्कराचं नाव आहे. व्हाॅट्स अॅपच्या मदतीने आॅर्डर घेऊन तो महाविद्यालयीन तरुणांपर्यंत गांजा पोहचवायचा. तर अरमान शेख (२०) यालाही बीपीटी काॅलनी वाडीबंदर येथून गांजा तस्करीप्रकरणी अटक केली आहे. 


रंगेहाथ पकडलं

मुंबईत पश्चिम उपनगरात नामांकित महाविद्यालये आहेत. उच्चभ्रू सोसायटी आणि महाविद्यालयातील विद्यार्थी
गांजाचं व्यसन करत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर संबंधित काॅलेजच्या मुलांना गांजाची तस्करी करणाऱ्या तस्कराच्या मागावर  अंमली पदार्थ विरोधी पथक (एएनसी) होते. त्यावेळी सुनिल छुप्या पद्धतीने  गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी सुनिलला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला होता. पोलिसांनी त्याला वांद्रे परिसरातून अटक केली. त्याच्याजवळून १ लाख ८० हजार रुपयांचा गांजा हस्तगत केला आहे. तर दुसरीकडे आझाद मैदान युनिटनेही अरमान शेख (२०) याला बीपीटी काॅलनी वाडीबंदर येथून गांजा तस्करीप्रकरणी अटक केली आहे. त्याच्याजवळून पोलिसांनी ३ लाख २० हजार रुपयांचा गाजा हस्तगत केला आहे. या प्रकरणी एएनसीचे पोलिस अधिक तपास करत आहेत.     हेही वाचा  -

माजी क्रिकेटपट्टू संदीप पाटील यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊट, शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मुख्यमंत्री सहय्यता निधीतून ७५ लाख लाटले, डॉक्टरला अटक
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा