माजी क्रिकेटपट्टू संदीप पाटील यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊट, शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

संदीप पाटील त्यांनी कधी ही सोशल मिडियाचा वापर केला नाही, किंवा त्यांचे कोणते ही फेसबुक, ट्विटर किंवा अन्य कोणतेही अकाऊन्ट नाही. असे असताना अनोळखी व्यक्तीने त्यांच्या नावाने पाटील यांचा फोटोवापरून फेसबुक अकाऊन्ट उघडून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे

माजी क्रिकेटपट्टू संदीप पाटील यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊट, शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
SHARES


भारतीय क्रिकेट खेळाडूंना जीवे मारण्याची धमकी देणारा ई-मेल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय)ला आल्याची घटना ताजी असताना.  राष्ट्रीय क्रिकेट समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांच्या नावाने अनोळखी व्यक्तीने फेसबुक अकाऊन्ट उघडून, त्याद्वारे बीसीसीआयचे पदाधिकारी आणि माजी क्रिकेटपट्टूची माहिती  मिळवण्याचा  प्रकार पुढे आला आहे.  या प्रकरणी संदीप पाटील यांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.



संदीप पाटील यांचे बनावट फेसबुक अकाऊट 


भारताचे माजी क्रिकेट पट्टू संदीप पाटील हे तडाखेबंद फलंदाज म्हणून सर्वांना परिचयाचे असले, तरी यशस्वी प्रशिक्षक, निवड समितीचे माजी सदस्य, चित्रपट अभिनेते, लेखक, संपादक अशा विविध भूमिकांत समरस झालेले पहायला मिळाले आहेत.  21 व्या शतकात भारताचे बहुतांश वरिष्ठ खेळांडूप्रमाणे सोशल मिडियावर आपल्या भावना व्यक्त करतात, माञ संदीप पाटील यांनी आज तागायत कधी ही सोशल मिडियाचा वापर केला नाही, किंवा त्यांचे कोणते ही फेसबुक, ट्विटर किंवा अन्य कोणतेही अकाऊन्ट नाही. असे असताना अनोळखी व्यक्तीने त्यांच्या नावाने पाटील यांचा फोटोवापरून फेसबुक अकाऊट उघडून त्यांच्या नावाने फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.

माजी खेळाडूंची माहीत मिळवण्याचा प्रयत्न


संदीप पाटील यांच्या नावाने उघडलेल्या फेसबुक खात्यावरून आरोपीने भारताचे माजी क्रिकेटपट्टू, बीसीसीआयचे पदाधिकारी यांचे फोननंबर व इतर माहिती मेसेंजरद्वारे मागितल्याचे पोलिसांनी सांगितले. मागील दोन आठवड्यापासून हा प्रकार सुरू होता. त्यावेळी अनेक क्रिकेटपट्टूंनी पाटील यांनी नंबर मागितला असल्याचे समजून स्वत:चे मोबाइलनंबर दिल्याचे ही कळते. दरम्यान 19 आँगस्ट रोजी पाटील हे दादर शिवाजी पार्क येथे असताना. त्याच्या मिञांने फोनद्वारे त्याच्या नावे कुणीतरी फेसबुक अकाऊन्ट सुरू केल्याचे सांगितले. त्यानंतर काही तासात दुसऱ्या एका मिञाने त्यांना फोन करून "नंबर असताना, पून्हा फेसबुकवर नंबर का ? मागितला" याबाबत विचारणा केली. त्यावेळी पाटिल यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले. अनोळखी व्यक्ती ऐवढ्यावरच न थांबता, पाटील यांचे नाव वापरून बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची माहिती ही मागितल्याचे पुढे आले.

पोलिसात गुन्हा दाखल

प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संदीप पाटील यांनी त्यांचे मिञ तसेच 'बीसीसीआय'ला या घटनेची माहिती दिली. तसेच पाटील यांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात सोमवारी सकाळी तक्रार नोंदवली. त्यानुसार शिवाजी पार्क पोलिसांनी माहिती तंञद्यान कायदा 66(सी) नुसार गुन्हा नोंदवला असून पोलिस आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती शिवाजी पार्क पोलिसांनी दिली.
 




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा