Advertisement

सकाळची 9.53ची गोरेगाव-चर्चगेट फास्ट लोकल रद्द होणार?

पश्चिम रेल्वेचा हा निर्णय मागे घेण्यासाठी प्रवाशांनी स्वाक्षरी मोहीम राबवली. एसी लोकलमुळे साध्या लोकल रद्द का करत आहात असा सवाल संतप्त प्रवासी विचारत आहेत.

सकाळची 9.53ची गोरेगाव-चर्चगेट फास्ट लोकल रद्द होणार?
SHARES

पश्चिम रेल्वेवर प्रवाशांची संख्या वाढत असून, नियमित उपनगरीय गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र, पश्चिम रेल्वे प्रशासनाने नियमित उपनगरीय गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. 

पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित उपनगरीय गाडय़ांमुळे इतर उपनगरीय गाडय़ांना उशीर होत असून, पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा ढासळू लागला आहे. यावर उपाय म्हणून पश्चिम रेल्वेने गर्दीच्या वेळेत सकाळी 9.53 वाजता सुटणारी गोरेगाव-चर्चगेट फास्ट लोकल रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

पश्चिम रेल्वेवरील अनेक सामान्य लोकल फेऱ्या रद्द करून वातानुकूलित लोकल चालवल्या जात आहेत. त्यामुळे आता बोरिवली-चर्चगेट जलद वातानुकूलित लोकल सकाळी 9.53 मुळे सकाळी 9.53 ची गोरेगाव-चर्चगेट फास्ट लोकल रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

सरकारी आणि खासगी कार्यालयातील बहुतांश कर्मचारी सकाळीच गोरेगाव स्थानकातून चर्चगेटला जातात. विरार, बोरिवली ते चर्चगेट या लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी असते. बोरिवलीहून सुटणाऱ्या सेमी फास्ट लोकलला बोरिवली ते मालाड दरम्यान प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे गोरेगावमधील प्रवाशांना लोकल ट्रेनमध्ये चढता येत नाही.

काही प्रवासी लोकलच्या दरवाजाला लटकून आपला जीव धोक्यात घालतात. त्यामुळे गेल्या दहा-बारा वर्षांपासून गोरेगाव, जोगेश्वरीच्या प्रवाशांसाठी गोरेगाव-चर्चगेट लोकल सुरू करण्यात आली आहे. यामध्ये गोरेगाव-चर्चगेट फास्ट लोकल वेळेनुसार सकाळी 8:25, 8:57, सकाळी 9:33 आणि 9:53 या वेळेनुसार गोरेगावमधून सुटतात. 

मात्र गेल्या काही दिवसांपासून वातानुकूलित लोकल ट्रेनमुळे या लोकल ट्रेनच्या वेळेवर परिणाम होत असून या लोकलचा वक्तशीरपणा विस्कळीत होत आहे. त्यामुळे आता वक्तशीरपणा सुधारण्यासाठी पश्चिम रेल्वेने गोरेगाव-चर्चगेट लोकल रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

लोकल सुरू ठेवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

गोरेगाव येथून प्रवास सुरू करणाऱ्या महिला-पुरुष प्रवाशांची मोठी गर्दी असते. या लोकलच्या महिला प्रवाशांनी पुढाकार घेऊन सकाळी 9.53 ची गोरेगाव-चर्चगेट लोकल सुरू ठेवण्यासाठी लोकलमध्ये स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

सकाळी 9.53 ची गोरेगाव-चर्चगेट लोकल कायमस्वरूपी बंद राहणार नाही. टीआरटी मशीनद्वारे स्लीपर नूतनीकरणासाठी अंधेरी-विलेपार्ले दरम्यान अप मार्गावर सध्या वेग मर्यादा आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल उशिराने धावत आहेत. वेगावरील निर्बंध शिथिल झाल्यानंतर लोकल सेवा पुन्हा सुरू होतील. तसेच, दररोज सकाळी 9.53 ची गोरेगाव-चर्चगेट लोकल रद्द केली जाणार नाही, असे प्रशासनाने सांगितले.

वातानुकूलित लोकल गाड्यांना दरवाजे उघडण्यास आणि बंद करण्यास जास्त वेळ लागतो. त्यामुळे संपूर्ण पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा ढासळतो. परिणामी, पश्चिम रेल्वे प्रशासनाने वातानुकूलित लोकल गाड्यांची वक्तशीरता सुधारण्यासाठी डिसेंबर 2023 मध्ये सहा सामान्य लोकल गाड्यांच्या वेळेत काही मिनिटांनी बदल केला. त्यामुळे सकाळी 7.55 वाजता सुटणाऱ्या विरार-चर्चगेट फास्ट लोकलचा बोरीवली थांबा रद्द करण्यात आला.हेही वाचा

दोन वर्षांत मुंब्रा ते कळवा दरम्यान रेल्वेतून पडून 31 जणांचा मृत्यू

मध्य रेल्वेच्या 'या' स्थानकांवर स्वस्त दरात भोजन

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा