चालत्या कारमधून तरूणाची स्टंटबाजी, पुढे जे झाले ते...

मुंबईतील मानखुर्द फ्लायओव्हरवरून छेडा नगरला जाताना एका ओला कॅबमधल्या मुलीने हा व्हीडिओ शेअर केला.

चालत्या कारमधून तरूणाची स्टंटबाजी, पुढे जे झाले ते...
SHARES

तरूणीला इम्प्रेस करण्यासाठी एका तरूणाने कारच्या पुढच्या खिडकीतून स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल माडियावर व्हायरल होत आहे. मानखुर्द फ्लायओव्हरवरील हा व्हिडिओ आहे. या तरुणामुळे इतर प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी वाहतूक पोलिसांकडे सोशल मिडीयावर होत आहे.

मानखुर्द फ्लायओव्हरवर छेडानगर येथे मंगळवारी रात्री एक तरूण कारच्या बाहेर स्टंटबाजी करताना ट्वीटर शेअर करण्यात आला आहे. या तरूणाने तरूणीसमोर शायनिंग मारण्यासाठी हा पराक्रम केल्याचे म्हटले जात आहे.

ज्या व्यक्तीने हा व्हीडीओ शेअर केला आहे, त्याने असा दावा केला आहे की हा तरूण त्याच्या गर्लफ्रेंडला खूष करण्यासाठी अशा प्रकारे खिडीकीला लटकत स्टंटबाजी करीत आहे. या व्हीडीओला शेअर करताना मुंबई पोलीसांना टॅग करीत या तरूणावर कारवाई करण्याची मागणी इंटरनेटधारकांनी केली आहे.

मुंबईतील मानखुर्द फ्लायओव्हरवरून छेडा नगरला जाताना एका ओला कॅबमधल्या मुलीने हा व्हीडिओ शेअर केला. मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजताची ही घटना असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, या तरूणाचा शोध घेतला जात असून मानखूर्द ट्रॅफीक डीव्हीजनला या तरूणावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे मुंबई पोलीसांनी या व्हीडीओला प्रतिक्रीया दिली आहे.हेही वाचा

मुंबईतील धीरुभाई अंबानी स्कूल बॉम्बने उडवून देण्याची धमकी

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा