न्हावा-शेवा बंदरावर चांदीची करणाऱ्या व्यापाऱ्याला अटक

गृहपयोगी वस्तूंच्या नावाखाली २ कोटी रुपयांच्या चांदीची तस्करी करणाऱ्या एका व्यावसायिकाला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. राजेंद्रसिंग कुशवाहा (३७) असं या आरोपीचं नाव आहे.

न्हावा-शेवा बंदरावर चांदीची करणाऱ्या व्यापाऱ्याला अटक
SHARES

गृहपयोगी वस्तूंच्या नावाखाली २ कोटी रुपयांच्या चांदीची तस्करी करणाऱ्या एका व्यावसायिकाला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. राजेंद्रसिंग कुशवाहा (३७) असं या आरोपीचं नाव आहे.  


कंटेनरमध्ये तस्करीचा माल

परदेशातून एलईडी दिवे, बॅग, पादत्राणे आदी वस्तूंच्या आयातीसोबत तस्करीच्या मार्गाने चांदी आणली जात असल्याची माहीती डिआरआयला मिळाली. त्यानुसार न्हावा-शेवा बंदरावर जहाजातून आलेल्या ७ कंटेनरमध्ये इमिटेशन ज्वेलरी, एलईडी दिवे, बॅग, पादत्राणे आदी वस्तूंची डीआरआयने तपासणी केली. त्यावेळी ३ कंटेनरमधील प्लास्टिकच्या १७ खोक्‍यांत चांदीचे दागिने अधिकाऱ्यांना सापडले. डीआरआयच्या पथकाने २२५ किलो चांदीच्या बांगड्या व कर्णफुले हस्तगत केली.


खोक्यांची तपासणी

त्याचप्रमाणे ४ मे रोजी आलेल्या कंटेनरमधील ५ प्लास्टिक खोक्‍यांची तपासणी केल्यावर त्यात २९५ किलो चांदी सापडली. राजेंद्रसिंगने एकूण ५२० किलो चांदीची तस्करी केल्याचं निष्पन्न झालं असून, या मुद्देमालाची किंमत २ कोटी ८ लाख रुपये आहे. तपासात या प्रकरणाचे धागेदोरे मध्य प्रदेशातील इंदूरपर्यंत गेले असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. चांदीच्या तस्करीत कुशवाहाचा हात असल्याचं उघड झाल्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.  



हेही वाचा-

मी भारतात परतण्यास तयार, पण एका अटीवर- झाकीर नाईक

मुंबईत व्हायला आला हिरो, बनला चोर!



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा