पार्थो दासगुप्तांचा जामीन अर्ज फेटाळला


पार्थो दासगुप्तांचा जामीन अर्ज फेटाळला
SHARES

टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या 'बार्क'चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला आहे. २४ डिसेंबर २०२० रोजी टिआरपी घोटाळ्याप्रकरणी पार्थो दासगुप्ता यांना अटक करण्यात आली होती. सत्र न्यायालयाने दासगुप्ता यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने आता त्यांच्या वकीलाकडून मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी दाद मागण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वीच बनावट टीआरपी घोटाळ्यात अडकलेल्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट रिसर्च ऑडियन्स कौन्सिलचे बीआरसी माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त आणि धक्कादायक व्हाट्सप्प चॅट उघड झाले आहे. त्यानंतर आज दासगुप्ता यांची तब्येत अचानक बिघडली असून, त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दासगुप्ता सध्या तळोजा कारागृहात होते. त्यांची प्रकृती आज पहाटे अचानक बिघडली त्यांना मधुमेह असून, रक्तातील साखरेचे प्रमाण शुक्रावारी मध्यरात्रीपासून वाढण्यास सुरुवात झाली होती.

पार्थ दासगुप्ता यांना जे.जे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वासनावर ठेवण्यात आले होते. त्यांचा जामीन न्यायलयाने नुकताच फेटाळला होता. या प्रकरणात त्यांचा मोठा हात असल्याने त्यांना जामीन देण्यात आला नव्हता. बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणी अटक झाली असून चौकशीचा फेरा सुरु आहे. दरम्यान अन्वय नाईक आणि मातोश्री कुमद नाईक आत्महत्येप्रकरणी गोस्वामी यांना अटक झाली होती.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा