नायझेरियन तस्कर ठरतायेत पोलिसांची डोकेदुखी

मुंब्रा, दिवा, मिरारोड, वसई, कल्याण आणि नवी मुंबईतील काही भागांत मोठ्या संख्येनं वास्तव्यास असलेल्या नायझेरीयन नागरिकांच्या गुन्हेगारी विषयक हालचाली रोखण्याचं नवं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.

नायझेरियन तस्कर ठरतायेत पोलिसांची डोकेदुखी
SHARES

नशेचा अंमल शहराच्या कानाकोपऱ्यात पोहचवणाऱ्या नायझेरियन तस्करांमुळे पोलिसांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढतच आहे. या तस्करांनी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना वेळोवेळी लक्ष केल्यामुळे सध्या हे नायझेरियन पोलिसांच्या हिट लिस्टवर आले आहेत. मात्र या नायझेरियन तस्करांना पकडून देखील त्यांचा त्रास कमी होत नाही. याचं कारण की हे तस्कर भारतात आल्यानंतर आपला पासपोर्ट आणि इतर ओळखपत्र नष्ट करतात. त्यामुळे अटकेनंतर  त्यांना त्याच्या देशात पाठवताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागले.


तस्करांची वाढती मक्तेदारी

मुंब्रा, दिवा, मिरारोड, वसई, कल्याण आणि नवी मुंबईतील काही भागांत मोठ्या संख्येनं वास्तव्यास असलेल्या नायझेरीयन नागरिकांच्या गुन्हेगारी विषयक हालचाली रोखण्याचं नवं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे. या नायझेरीयन नागरिकांनी एमडी आणि एफेड्रीन अशा अनेक नव्या अमली पदार्थांची तस्करी भारतात सुरू केल्यानं त्या अमली परार्थांची पडताळणी करताना पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत. बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करणारे ९५ टक्के नायझेरियन ऑनलाईन फसवणूक आणि अमली पदार्थांची तस्करी करतात.

विशेष म्हणजे नायझेरियन नागरिक शिक्षणासाठी किंवा टुरिस्ट म्हणून व्हिसा मिळवतात आणि भारतात येतात. त्यांच्या देशात असलेल्या गरीबीमुळे मायदेशात परत पाठवलं जाऊ नये म्हणून भारतात आल्यानंतर ते आपले पासपोर्ट आणि इतर कागदपत्रं फाडतात किंवा नष्ठ करतात. त्यामुळे भारतात पोलिसांनी त्यांना पकडलं आणि मायदेशात पाठवण्याचा प्रयत्न केला, तर बिना पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांमुळे त्या नायझेरियन तस्करांना त्यांचा देश स्विकारत नाही. अनेक नायझेरियन भारतीय तरुणींशी लग्न करून भारतात स्थायिक झाले आहेत


पोलिसांना भुर्दंड

अटकेत असलेल्या अनेक नायझेरियन आरोपींच्या जिभेचे चोचलेही तितकेच असतात. नुकतीच जुहू पोलिसांना याचा अनुभव आला होता. जुहू पोलिसांनी एका नायझेरियन आरोपीला डिपोर्ट करण्यासाठी ताब्यात घेतलं होतं. मात्र त्या आरोपीला त्याचा देश स्वीकारत नसल्यामुळे महिन्याभरापासून तो पोलिसांच्या ताब्यात होता. त्यावेळी त्या आरोपीला भारतीय जेवण पचत नसल्यायनं त्याला चायनीज आणि तंदुरी देत पोलिसांचे खिसे रिकामी झाले होते.

तर हल्ली अटकेत असलेल्या नायझेरियन तस्तकांच्या सुटकेसाठी भारतीय तस्कर पुढे येत आहेत. यातील काही नायझेरियन लग्न करून भारतात स्थायिकही झाले आहेत. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या नायझेरियन तस्करांच्या व्याप्तीमुळे पोलिसांची डोकेदुखीत वाढ झाली आहे. त्यामुळे या नायझेरियन तस्तरांविरोधात पोलिसांनी आता कंबर कसली असून त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे.


नायझेरियन आणि पोलिसांमधील चकमक 

दक्षिण मुंबईच्या वाडीबंदर परिसरात डोंगरी-पायधुरनी उड्डाणपुलावर दररोज अनेक नायजेरियन अंमली पदार्थांची तस्करीसाठी येत असल्याची तक्रार पोलिसांकडे स्थानिकांनी केली होती. त्यानुसार तस्करांना पकडण्यासाठी तत्कालीन पोलिस सह आयुक्त (गुन्हे) अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सात पोलिसांची पथकं बनवण्यात आली.

पथकात २० सशस्त्र अधिकारी आणि ५० अंमलदार असे एकूण ७० कर्मचारी होते. कारवाईदरम्यान सर्व मार्गांवर पोलिसांनी सापळा लावला होता. मात्र उड्डाणपुलाखाली रेल्वे रूळ असल्यानं आणि  उड्डाणपूलाची उंची 20 ते 30 फूट असल्यानं आरोपी ऐवढ्या उंचावरून उड्या टाकून पळू शकणार नाहीत, असा अंदाज वर्तवत पोलिसांनी उड्डाणपूलाखाली पोलिस बंदोबस्त ठेवला नव्हता.

ठरल्यानुसार २८ एप्रिलच्या २०१६ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास बेसावध असलेल्या २० ते २५ नायजेरियन तस्करांना पकडण्यासाठी पोलिस साध्या वेशात गेले होते. पोलिस आल्याचे कळताच तस्करांची पळापळ झाली. तस्करांनी बंदोबस्त न ठेवलेल्या तब्बल २० ते ३० फुट उंचीच्या उड्डाणपुलाहून उडी टाकत भायखळाच्या दिशेनं पळ काढून पोलिसांना चकवा दिला.

पोलिसांनी तस्करांचा पाठलाग करत दोघांना ताब्यात घेतलं. त्यानंतर इतर तस्करांनी त्या दोघांच्या सुटकेसाठी पोलिसांच्या दिशेने दगड मारण्यास सुरुवात केली. तर एका अधिकाऱ्याला घेरून त्याला दगडानं ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी पोलिसांनी तीन राऊंड फायर केल्याने तस्करांनी पळ काढला. या दगडफेकीत तीन अधिकारी आणिा चार पोलिस अंमलदार जखमी झाले. अंधाराचा फायदा घेत उरलेले तस्कर भायखळ्याच्या दिशेनं फरार झाले.


पोलिसांवर जिवघेणार हल्ला

सात महिन्यांपूर्वी अशाच एका कारवाईवेळी पुन्हा तोच अनुभव पोलिसांच्या वाट्याला आला. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर नायझेरियन तस्करांनी दगडानं हल्ला चढवला. या हल्यात वरळी युनिटचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन दराडे आणि अमर मराठे यांनाही नायझेरियन तस्करांनी घेरून दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं त्यावेळी इतर पोलिस मदतीसाठी धावून आले. मात्र या नायझेरियन तस्करांची माहिती असून सुद्धा आज ही हद्दीच्या वादातून लोकल पोलिस त्यांच्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात.

अटक तस्करांची आकडेवारी

 

वर्ष 
नायझेरियनवरील गुन्हे 
अटक नायझेरियन
२०१५३१३८
२०१६१७२३
२०१७
१४२९
२०१८
११हेही वाचा

लाच घेणाऱ्या पोलिसांवर थेट ‘बडतर्फ’ची कारवाई

बारमध्ये शुटींग काढणे पडले महागात, ग्राहकाला नग्न करून बारमालकाने दिला चोपसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा