Advertisement

बारमध्ये शुटींग काढणे पडले महागात, ग्राहकाला नग्न करून बारमालकाने दिला चोप

तक्रारदार हा बारमध्ये मद्यप्राशन करत असताना. त्याने त्याच्या मोबाइलवरून बारमधला व्हिडिओ काढला होता. ही बाब बारमधील मॅनेजरला कळाल्यानंतर मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांनी त्याला मारहाण करत, त्याचा मोबाइल काढून घेतला.

बारमध्ये शुटींग काढणे पडले महागात, ग्राहकाला नग्न करून बारमालकाने दिला चोप
SHARES
Advertisement

चेंबूरच्या एका बारमध्ये मोबाइलनं शुटींग केल्याप्रकरणी ग्राहकाला बार मालक आणि कर्मचाऱ्यांनी नग्नकरून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. बार मालकांनं ऐवढ्यावरच न थांबता तो व्हिडिओ सोशल मिडियावरही वायरल केला. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी बार मालक, बार चालवणारा आणि कर्मचाऱ्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. 


नेमके काय घडलं?

गोवंडी परिसरात राहणारा ४५ वर्षीय तक्रारदार हा एका नामांकित तमाशात ढोलकी वाजवतो.  तक्रारदाराला दारूचे व्यसन असल्यानं तो दररोज चेंबूरच्या राम पंजाब बारमध्ये दारू पिण्यास जायचा. १६ फेब्रुवारी रोजी तक्रारदार हा बारमध्ये गेला असता त्यानं मोबाइलवरून बारमधला व्हिडिओ काढला होता. ही बाब बारमधील मॅनेजरला कळाल्यानंतर मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांनी त्याला मारहाण करत, त्याचा मोबाइल काढून घेतला. दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ फेब्रुवारी रोजी तक्रारदार त्याचा मोबाइल घेण्यासाठी सायंकाळी बारमध्ये गेला. त्यावेळी बार मॅनेजर जगदीश शेट्टी, बार चालवणारा सुखदेव पाटील आणि बारमध्ये काम करणारा अब्दुल अजीज यानं त्याला मारहाण केली.


ग्राहकाला नग्न करून मारहाण

तक्रारदाराच्या अंगावरील कपडे काढून त्याचा नग्न अवस्थेतला व्हिडिओ मोबाइलमध्ये काढला. या घटनेची माहीती तक्रारदारानं त्याच्या घरच्यांना आणि मित्रांना दिली. याप्रकरणी तक्रारदारानं २० फेब्रुवारी रोजी चेंबूर पोलिस ठाण्यात या तिघांविरोधात ३९४, ३४१, ३५५, ५०४, ५०६, ३४ भा.द.वि सह ६७ आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान चेंबूर पोलिसांनी यातील बार कर्मचारी अब्दुल अजीज याला अटक केली असून इतर दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणात अन्य कुठल्या आरोपीचा सहभाग आहे का ? हे पोलिस पडताळून पहात आहेत. संबंधित विषय
Advertisement