पत्नींची अदलाबदल करण्यावरुन व्यापाऱ्याची हत्या


पत्नींची अदलाबदल करण्यावरुन व्यापाऱ्याची हत्या
SHARES

मुंबईच्या मालवणी येथे झालेल्या हत्येची उकल मालवणी पोलिसांनी केली असून या प्रकरणी पोलिसांनी सलमान (२९) (बदललं नाव) नावाच्या आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे हत्येचं कारण ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला आहे. हत्येचा हा प्रकार पत्नी बदलण्याच्या नादात झाल्याची माहिती मालवणी पोलिसांनी दिली आहे.


पत्नीचा केला होता सौदा...

आरोपी सलमान आणि मयत करीम मन्सुरी (बदलेलं नाव) या दोघांमध्ये आपापल्या पत्नी बदलण्याचा सौदा झाला होता. सौद्याप्रमाणे करीम मन्सुरीने सलमानच्या पत्नीसोबत वेळ घालवला, पण स्वत:च्या पत्नीला मात्र त्यान पाठवले नाही. त्याने सलमानकडे पत्नीला पाठवण्यास नकार दिला. या नकाराने सलमान एवढा संतापला की त्याने करीमची हत्या केली. त्याने करीमला भेटायच्या बहाण्याने बोलावलं आणि तिथेच गळ्यात चाकू भोसकून त्याची हत्या केली.

हत्येनंतर ज्यावेळी करीमची बायको आपल्या नवऱ्याचा शोध घेत होती, तेव्हा आरोपी सलमान तिच्याबरोबर करीमला शोधण्याचं नाटक करत राहिला. पण शेवटी पोलिसांनी त्याला गाठलंच. 'हत्येप्रकरणी आम्ही आरोपीला अटक केली असून उद्या त्याला कोर्टात हजार केलं जाईल,' अशी माहिती मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगडे यांनी दिली.  


काय आहे पत्नी बदलण्याचा हा प्रकार?

पत्नी बदलण्याचा हा प्रकार पाश्चिमात्य देशात मोठ्या प्रमाणात असून त्याला wife swapping किंवा partner swapping म्हटलं जात. यात दोन जोडपी आपले जोडीदार बदलतात आणि त्यांच्यात शाररिक संबंध होतात. हे सगळं चौघांच्या संमतीने होतं. कित्येकदा असं करण्यास महिलांवर जबरदस्ती केल्याचे प्रकारही समोर आले आहेत. कित्येकदा अशा प्रकरणांमध्ये शेवटी पोलीस ठाण्यात किंवा कोर्टात जातात.


का होतात असे प्रकार?

जी जोडपी आपल्या आयुष्यात जोडीदारापासून खूश नसतात, ती कित्येकदा असे प्रकार करण्यास प्रवृत्त होतात. कित्येकदा लैंगिक सुखासाठी असे प्रकार केले जातात, तर काही जण विकृती म्हणून देखील असे प्रकार करत असल्याचं समोर आलं आहे. पाश्चिमात्य देशात अशा प्रकारे पत्नी बदलण्याच्या अनेक वेब साईट्स देखील असून त्यांची लोकप्रियता देखील तितकीच आहे.



हेही वाचा

दाऊद इब्राहिमची पुन्हा अंजली दमानियांना धमकी?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा