डॉक्टरने घेतला मैत्रिणीच्या गालाचा चावा

 Kandiwali (W)
डॉक्टरने घेतला मैत्रिणीच्या गालाचा चावा
Kandiwali (W), Mumbai  -  

आपण म्हणतो, एक डॉक्टर हा जीवनदाता असतो. पण कांदिवलीच्या चारकोपमधील एका डॉक्टराने तर हद्दच पार केली. या डॉक्टराने रागाच्या भरात आपल्या मैत्रिणीच्या गालाचाच चावा घेतला. या डॉक्टराचे नाव सुरेश यादव (34) असे आहे. या डॉक्टर विरोधात अदखलपात्र गुन्हा पोलिसांत दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा - सावधान ! असा फोन तुम्हालाही येऊ शकतो...

सांगितले जाते की, 24 वर्षांची महिला आणि या डॉक्टर यांच्यात चांगली मैत्री होती. दोघेही नेहमी एकमेकांशी भेटत आणि बोलत. मात्र काही दिवसांपासून दोघांमध्ये बिनसले होते. दोघांनीही एकमेकांशी बोलणे बंद केले होते. पण 16 जूनला या मुलीने त्या डॉक्टरला आपल्या मित्राचे पैसे देण्यासाठी बोलावले. त्यानुसार डॉक्टर सुरेश यादव तिच्या घरी गेला देखील मात्र, तिथे पैशावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद एवढा वाढत गेला की डॉक्टर महाशयांनी आपल्या मैत्रिणीलाच मारहाण करायला सुरुवात केली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर, आपल्या मैत्रिणीच्या गालाचा या डॉक्टरने चक्क चावाच घेतला. एवढा तमाशा झाल्यावर 24 वर्षाच्या त्या तरुणीला गप्प बसणे शक्य नव्हते. तिने यानंतर थेट चारकोप पोलिस ठाणे गाठले आणि या डॉक्टर विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

हे देखील वाचा त्याला फसवायचं होतं 200 पंचतारांकीत हॉटेलांना!

Loading Comments