मुख्यमंत्री सहय्यता निधीतून ७५ लाख लाटले, डॉक्टरला अटक

. आरती शिगवण हिचा कायम मंत्रालयात वावर होता. त्यामुळे या निधीबाबत तिला संपूर्ण माहिती होती. त्यावेळी तिने पाटीलच्या मदतीने जुलै २०१७ पासून बनावट रुग्णांची कागदपत्रे सादर केली.

मुख्यमंत्री सहय्यता निधीतून ७५ लाख लाटले, डॉक्टरला अटक
SHARES
राज्यातील गरीब कुटुंबातील  रुग्णांना आर्थिक मदत करणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैशांची चणचण भासू लागली असताना, याच निधीतून रुग्णांच्या नावाची बनावट कागदपत्रे सादर करून लाखो रुपयांची रक्कम लाटणाऱ्या डाॅक्टरला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. डाॅ. अनिल हरीष नागराळे-पाटील (४०) असं या डाॅक्टरचं नाव असून त्याने दोन वर्षात ६४ रुग्णांच्या नावाखाली ७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचं चौकशीत पुढं आलं आहे. याप्रकरणी आरती शिगवण नावाच्या महिलेलाही गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. तिनेच नागराळेला हा फसवणुकीचा मार्ग दाखवला.


 बनावट रुग्ण

हृदयरोगाच्या विविध शस्त्रक्रिया, अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या ट्रामातंर्गत रुग्ण, सर्व प्रकारचे कॅन्सरग्रस्त तसंच ५० वर्षांखालील सेरेब्रो व्हॅस्क एपिसोड (सीव्हीई) च्या रुग्णांवर उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो.  गरीब व मध्यमवर्गीय गटातील अनेक कुटुंबांची उपचाराचा खर्च करण्याची कुवत नसते. या रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून आर्थिक मदत मिळते. मात्र याच गोष्टीचा दुरपयोग पाटील याने केला. ठाण्यातील एका प्रतिष्ठीत रुग्णालयात जुलै २०१७  ते फेब्रुवारी २०१९ पर्यंत तो भागीदार होता. आरती शिगवण हिचा कायम मंत्रालयात वावर होता. त्यामुळे या निधीबाबत तिला संपूर्ण माहिती होती. त्यावेळी तिने पाटीलच्या मदतीने जुलै २०१७ पासून बनावट रुग्णांची कागदपत्रे सादर करून या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ७५ लाख रुपये लाटले. याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी केलेल्या तपासणीत ही फसवणूक उघडकीस आली. 

३० ऑगस्टपर्यंत कोठडी

 मिळणाऱ्या निधीतील ६० टक्‍क्‍यांहून अधिक वाटा आरती शिगवणला मिळायचा. याप्रकरणी नागराळेला शुक्रवारी गुन्हे शाखेने अटक केली असून न्यायालयाने त्याला ३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शिगवणला सोमवारी न्यायालयापुढं हजर करण्यात येणार आहे.




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा