सर्दी-खोकल्याच्या औषधाच्या बहाण्याने ड्रग्जची तस्करी, हजारो बाटल्या पोलिसांनी केल्या जप्त

मुंबईत ड्रग्ज तस्करांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडघा उगारल्याने ड्रग्ज सहजासहजी मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे गर्दुल्यांसह उच्चभ्रू तरुणांमध्येही कफ सिरपची मागणी वाढत आहे

सर्दी-खोकल्याच्या औषधाच्या बहाण्याने ड्रग्जची तस्करी, हजारो बाटल्या पोलिसांनी केल्या जप्त
SHARES

वातावरणात बदल होताच सर्दी-खोकल्याच्या तक्रारी वाढू लागतात, त्यामुळे विविध कंपनीच्या कफ सिरपच्या खपातही तितकीच वाढ होते. याचाच गैरफायदा नशेबाज घेत असून हे औषध नशेसाठी वापरले जात आहे. मुंबईत ड्रग्ज तस्करांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडघा उगारल्याने ड्रग्ज सहजासहजी मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे गर्दुल्यांसह उच्चभ्रू तरुणांमध्येही कफ सिरपची मागणी वाढत आहे. असाच ७ हजार ड्रग्जच्या बाटल्यांचा साठा मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या विभागाने हस्तगत केला आहे.

अंमली पदार्थविरोधी पथकाने ड्रग्ज पुरविणाऱ्यांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे ड्रग्जची मुंबईतील अवाक कमी झाली आहे. त्यामुळे नशा करण्यासाठी तरुण कफ सिरपचा सर्रास वापर करत आहेत. मुंबईच्या अंमली पदार्थ विभागाच्या घाटकोपर युनिटने पोलिस उपायुक्त शिवदीप लांडेंच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच एक कारवाई केली. या कारवाई दरम्यान २९ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी साकीर मोहम्मद हुसेन रेतीवाला याच्याजवळून ४०० नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बाटल्या हस्तगत केल्या, त्याच्या चौकशीत पुढे पोलिसांनी कुर्लातून ६६४० नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत. या बाटल्यांची किंमत १३ लाख २८ हजार इतकी आहे.

या कारवाई दरम्यान पोलिसांनी मानखुर्दच्या लल्लूभाई कंपाऊड येथून एका तरुणाला १७ किलो गांजासह अटक केली. रबीउल हसन याकूब शेख (२२) असे या आरोपीचे नाव आहे.  बाजारात या गांजाची किंमत ३ लाख ४० हजार इतकी आहे. या दोन्ही आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे.

हेही वाचाः- एकाच नंबरच्या दोन नोटा ? व्यापाऱ्यांना ८० लाखाला गंडवले

प्रतिबंधित गोळ्यांचेही सेवन

कफ सिरप बरोबरच प्रतिबंधित गोळ्यांचे सेवन तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात करत आहेत. सहा महिन्यांच्या कालावधीत अल्फाझोलाम गोळ्यांच्या १,२८६ स्ट्रिप्स जप्त करण्यात आल्या असून याची किंमत दोन लाख ५३ हजार रुपये इतकी आहे. ४७ हजार रुपये किंमतीच्या नेत्रावेट या गोळ्यांच्या ९४ स्ट्रिप्स हस्तगत करण्यात आल्या असून या गोळ्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय खरेदी केल्या जात आहेत.


हेही वाचाः-जमिनीच्या वादातून टोकाची भूमिका, आई-वडिलांसह पाच वर्षांच्या मुलीची आत्महत्या


Read this story in हिंदी
संबंधित विषय