मरीन ड्राईव्ह हॉस्टेलमधील त्या तरूणीवर बलात्कार, फॉरेन्सिक अहवालात उघड

तरुणीच्या शरीरावरील सीमेन सँपलचे नमुने आरोपीच्या DNA शी जुळले

मरीन ड्राईव्ह हॉस्टेलमधील त्या तरूणीवर बलात्कार, फॉरेन्सिक अहवालात उघड
SHARES

मरीन ड्राईव्ह हत्या (Marine Drive Hostel Murder) प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे.

तरुणीवर बलात्कार झाल्याचं फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झालं आहे. फॉरेन्सिक अहवालात तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची बाब उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

मुंबईतील शासकीय वसतिगृहामध्ये मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा देखील दाखल केला होता.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओम प्रकाश कनोजियाच्या हाडाचे डीएनए नमुने पीडितेच्या नखांवरून मिळालेल्या डीएनए नमुन्याशी जुळले आहेत.

पोलिसांनी पुढे सांगितलं की, "घटनास्थळी सापडलेल्या सीमेन सँपलचे डीएनए मुलीच्या नेल क्लिपिंगमधून मिळालेल्या डीएनए प्रोफाइलशी जुळले आहेत." असे अधिकारी पुढे म्हणाले.

तसेच व्हजाइनल स्वॅब तपासणीतही लैंगिक अत्याचार झाल्याची पुष्टी झाली आहे, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या घटनेनंतर लगेचच कनोजिया यांनी आत्महत्या केली होती. 

मुंबईतील शासकीय वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरील खोलीत 6 जून रोजी तरुणीचा मृतदेह आढळला होता. अकोल्यातील 18 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करून त्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. पोलिसांनी राज्य न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या फॉरेन्सिक अहवालाचा हवाला देत ही माहिती दिली आहे. Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा