सार्वजनिक ठिकाणी नाचणाऱ्या इंस्टाग्राम इन्फ्लुअंसरला पोलिसांची तंबी

सीमा कनोजिया सार्वजनिक ठिकाणी विचित्र नाचते. तिचे बरेच व्हिडिओ व्हायरल होतात.

सार्वजनिक ठिकाणी नाचणाऱ्या इंस्टाग्राम इन्फ्लुअंसरला पोलिसांची तंबी
SHARES

सीएसएमटी प्लॅटफॉर्मवर रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन करून अश्लील नृत्य करणाऱ्या सीमा कनोजियाला पोलिसांनी चांगलीच तंबी दिली आहे. सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये कनोजियाने सॉरी म्हटलं आहे. क्लिपमध्ये, तिने सार्वजनिक आवारात नृत्य करणे चुकीचे असल्याचे सांगितले. तिने इतर युट्युबरला देखील असे न करण्याचा सल्ला दिला. 

“मी रेल्वे प्लॅटफॉर्मवर तयार केलेला डान्स व्हिडिओ हा कायदेशीर गुन्हा आहे. सर्व YouTubers आणि Instagrammers कृपया असे व्हिडिओ बनवू नयेत. सर्व प्रवाशांची मी माफी मगाते.” 

अनेकांनी यावर कमेंट करताना म्हटले आहे की, माफी तर मागितली पण तिला खरोखरच वाईट वाटले की नाही यावर शंकाच आहे. दुसऱ्या एका युझरने कमेंट केली आहे की, "मला वाटते की तिला मिळत असलेल्या प्रसिद्धीमुळे ती आनंदी आहे, तिच्या चेहऱ्यावर खेद जाणवत नाही,"

सीमा कनोजी बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणी विचित्र डांस करताना दिसून आली आहे. तिच्या या कृत्यामुळे इतरांना त्रास होतो. काही दिवसांपूर्वी तिने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर देखील अशाच प्रकारे डांस केला होता. तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याबाबतच अनेकांनी तक्रारी देखील केल्या होत्या. 

मध्य रेल्वेने याप्रकरणी ट्विटमध्ये प्रतिक्रिया दिली होती आणि म्हटले होते की, “वरील प्रकरणाची आरपीएफकडून चौकशी केली जात आहे. लवकरच कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. हेही वाचा

लसणाची पोती चोरल्याच्या कारणावरून दुकान मालकाची लोडरला मारहाण

नवजात बाळाला सार्वजनिक टॉयलेटमध्ये सोडून आई पसार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा