नवजात बाळाला सार्वजनिक टॉयलेटमध्ये सोडून आई पसार

काळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत एक अर्भक असल्याचे दिसले, पण...

नवजात बाळाला सार्वजनिक टॉयलेटमध्ये सोडून आई पसार
SHARES

नवजात मुलीला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील शौचालयात टाकून पळालेल्या महिलेचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

रिझवाना खातून ऊर्फ हिना रफिक खान (२३) असे तिचे नाव असून, ती धारावी येथे राहते. हे मूल अनैतिक संबंधातून जन्मले असल्याने पुरावा नष्ट करण्यासाठी रिझवानाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

रुग्णालयातील अपघात विभागाच्या शेजारी असलेल्या शौचालयात सफाई कर्मचारी सरस्वती डोंगरे शुक्रवारी नेहमीप्रमाणे साफसफाई करत होत्या. त्यांनी कचऱ्यासाठी ठेवण्यात आलेली बादली सफाईकरिता उचलली असता ती जड वाटली. त्यामुळे त्यांनी आत डोकावून पाहिले तर काळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत एक अर्भक असल्याचे दिसले.

ही बाब त्यांनी तत्काळ कर्त्यव्यावरील डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिली. डॉक्टरांनी अर्भकाला तपासले असता ते मृत असल्याचे आढळले. रुग्णालय प्रशासनाने हा प्रकार पोलिसांना कळवल्यानंतर सायन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.



हेही वाचा

विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोडवर शस्त्रासह एकास अटक

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा